शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल थरार! दरोड्यातील आरोपीच्या नातेवाईकांकडून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 20:08 IST

आरोपी टेंभुर्णी हद्दीत दरोडा टाकून गेल्या तीन महिन्यापासुन फरार झाला होता.

बाभुळगाव: टेभुर्णी (ता.माढा) सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकुन तीन महिन्यापासुन फरार आरोपीला सुगाव (ता.इंदापूर) येथील राहत्या घरातुन अटक केली. त्याला टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणत असताना आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस गाडीचा पाठलाग करून वाहनाला पाठीमागुन धडक देेेत पोलिसांना मारण्याचा व आरोपीला पळवुन नेण्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११ ) माळवाडी नं.१ (ता.इंदापूर) येथे घडली आहे. यामध्ये टेंभूर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी झाले आहे. .या प्रकरणी पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. योगेश रावसाहेब चितळे (वय३२) टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर दत्तु नारायण सावंत, रोहन दत्तु सावंत, अमोल दत्तु सावंत, उर्मिला दत्तु सावंत, शर्मिला दत्तु सावंत, सुरेखा दत्तु सावंत (सर्व रा. सुगाव, ता.इंदापूर,जि.पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे. 

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी अमोल सावंत याने टेंभुर्णी, सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकून तो गेल्या तीन महिन्यापासुन फरार झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात टेंभुर्णी पोलीस होते. गुप्त खबर्‍यामार्फत पोलिसांना खबर मिळाल्यावर टेंभुर्णी पोलिसांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला सुगाव येथील त्याच्या राहत्या घरी छापा टाकुन ताब्यात घेतले.

आरोपीला घेवुन टेंभुर्णी पोलीस इंदापूरकडे खासगी वाहनाने येत असताना पाठीमागुन एक्स यु व्ही माॅडेल असणाऱ्या चारचाकी गाडी (एमएच. १२, एएच.२५१५) फिर्यादींच्या गाडीचा पाठलाग करत आली. व माळवाडी नं १ येथे पोलिसांच्या गाडीला पाठीमागुन जोराची धडक दिली व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  तसेच याचवेळी आरोपींनी अमोल सावंतसिनेस्टाइल\ याला पोलिसांच्या ताब्यातुन सिनेस्टाईलने पळवुन नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस गाडीला पाठीमागुन व चार ते पाचवेळा जोराची धडक देवुन पोलीस गाडी दोन्ही बाजुनी चक्काचुर केली. 

यावेळी आरोपी अमोल सावंत याने फिर्यादींच्या उजव्या बरगडीत मारून त्यांना जखमी करून पळुन जाण्याचा प्रयत्न केला.आरोपीच्या नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांना धक्काबुक्की केली.या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी कर्मचारी जखमी झाले आहे.पोलिसांनी वरील सर्व आरोपींवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर टेंभुर्णी पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल सावंत याला अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ————————————————————————

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAccidentअपघात