चतु:शृंगी फुलली
By Admin | Updated: October 2, 2014 23:44 IST2014-10-02T23:44:25+5:302014-10-02T23:44:25+5:30
नवरात्र उत्सवाची धूम शिगेला पोहोचली असून, चतु:शृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आह़े दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आह़े

चतु:शृंगी फुलली
>पुणो : नवरात्र उत्सवाची धूम शिगेला पोहोचली असून, चतु:शृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आह़े दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आह़े चतु:शृंगी यात्रेला शनिवार, रविवार, मंगळवारी मोठय़ा संख्येने भाविक दर्शनाला आले होत़े नवरात्रोत्सवातील शेवटचे दोन दिवस राहिले असल्याने, भाविकांची संख्या वाढत आह़े या भाविकांना सुलभपणो दर्शन घेता यावे, त्याचबरोबर कोणताही घातपात होणार नाही, याची दक्षता चतु:शृंगी पोलीस घेत आह़े
चतु:शृंगी यात्रेत पूर्वी मोठय़ा संख्येने खेळणी, पाळणो, खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारले जात असत़ गेल्या काही वर्षामध्ये त्यावर बंधने आणण्यात आली आह़े चतु:शृंगी मंदिरासमोरील सेनापती बापट रस्त्यापासूनच संपूर्ण परिसरात 19 सीसीटीव्ही लावण्यात आले असून, त्याद्वारे 24 तास येणा:या-जाणा:यांवर नजर ठेवण्यात आली आह़े येणा:या भाविकांना रस्ता व्यवस्थित ओलांडता यावा, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आह़े पोलीस निरीक्षक एस़ ए़ निकम आणि डामसे यांच्यासह प्रत्येक पाळीत 1क् ते 12 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आह़े त्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाचे एक पथक आणि होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आह़े
येणा:या प्रत्येक भाविकांची व त्याच्या जवळील वस्तूंची तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात येत़े मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगर असल्याने खबरदारी म्हणून त्या बाजूलाही हत्यारी पोलिसांची नेमणूक केली आह़े
येणा:या भाविकांच्या माहितीसाठी व पोलिसांनी मदत कक्ष स्थापन केला असून, तेथून लोकांना आवश्यक ती मदत पुरविली जात़े या मदत कक्षातून लाऊड स्पीकरद्वारे भाविकांना विविध सूचना देण्यात येतात़ गेल्या 7 दिवसांत गर्दीत चुकलेल्या जवळपास 1क् लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सोपविण्यात आल़े
नवरात्रीच्या काळात चतु:शृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात़ त्यांना निर्विघ्नपणो दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीकडून विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत़
(प्रतिनिधी)
यात्रेत कोणताही घातपात होऊ नये व भाविकांना दर्शन घेताना त्रस होऊ नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या आहेत़ गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांचे दागिने चोरीचे प्रकार घडत असतात़ येथे चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे गेल्या 7 दिवसांत एकही गैरप्रकार घडला नाही़
- एस़ ए़ निकम, पोलीस निरीक्षक.