चाकणमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये किलबिलाट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:08+5:302021-02-05T05:13:08+5:30
शिक्षण विभागाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करत येथील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू ...

चाकणमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये किलबिलाट सुरू
शिक्षण विभागाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करत येथील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मुलींची शाळा नंबर दोनमध्ये सर्व विद्यार्थिनींना टेम्परेचर गन मशीनचा वापर करून विद्यार्थ्यांचे तापमान नोंद घेण्यात आली. ऑक्सिमीटरने ऑक्सिजन लेवल नोंदी घेतल्या. मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर ठेवून विद्यार्थिनी ओळीत तपासून वर्गात घेण्यात आल्या.
दरम्यानच्या कालावधीमध्ये पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले आहे.
शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात नियमात सुरू झाला. कित्येक दिवसांनी ओस पडलेले वर्ग बोलू लागले ,आणि मुलींनाही शिक्षणाची गोडी लावण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर डोम शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर यांच्या नियोजनाने सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा शाळेमधील पहिला दिवस आनंददायी ठरला.
शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर, शिक्षिका सत्यभामा पिंगळे,सुनंदा पाटील ,मनोज केंगले,जितेंद्र डेरे,तुकाराम वाटेकर,सुनंदा कारोटे,वसंत तळपे,वंदना गोडसे मॅडम ,हनुमंत कलवडे सर , मेघा गावडे मॅडम, कविता आल्हाट मॅडम, संदेश गावडे सर, तुकाराम भोसकर, सुजाता गायकवाड, महेश पाटील,रेखा बोत्रे,शंकर कड, हेमलता राऊत आदी शिक्षकांनी मोठ्या उत्साहात ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे.
चाकण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली.