शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

Pune Rain Update: जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरण 'ओव्हरफ्लो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:44 IST

पिंपळगाव-जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद

रोहोकडी : गेल्या सहा दिवसांपासून जुन्नर तालुक्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशांन सुरु असून दिवसागणिक पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे धरणांच्यापाणी पातळीत वाढ झालेली असून ती वाढतच जाणार असे दिसते. रविवार दि:-१०जुलै सकाळी आठ वाजे पर्यंत पिंपळगाव-जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

 जून महिन्यात पावसाने जोरदार हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र अधून मधून तुरळक पाऊस पडत होता. म्हणून खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा होती. त्यातच जुलै महिन्यात सुरुवातीस मान्सून चांगलाच सक्रिय झाल्याने कोकणासह सहयाद्री डोंगर रांगावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. याशिवाय तालुक्यातील पश्चिम उत्तरे कडील भागात पाऊस धो धो कोसळत आहे. त्यामुळे खाचरे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. ओढे नाले नद्या खळखळून वाहत आहेत.           जुलैपर्यंत पाऊस (मिलिमीटर)

पिंपळगाव-जोगे-३७८, माणिकडोह-३९९, येडगाव-२२५, वडज-१८०, चिल्हेवाडी-१७५, 

टॅग्स :Junnarजुन्नरRainपाऊसWaterपाणीDamधरण