शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Children' s Day : बालदिन म्हंजी काय ओ दादा..?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 7:18 PM

सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर..एवढ्या छोट्या जीवनरेषेत सामावलेली ही बंदिस्त मंडळी...

निशांत वाकोडे -  

पुणे: काही मुलांच्या आयुष्यातला ' बालदिन ' हा आकर्षक गिफ्ट,बागेतली मज्जा, भरपेट खाऊ, तसेच सहली यांनी समृध्द असतो. तर दुसरीकडे आभाळाचे छत , अंग झाकण्या इतपत देखील अपुरे कपडे, आयुष्याची दिशा सिग्नल, बसस्थानके , रेल्वेस्टेशन, यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांपुरतीच मर्यादित , यातना आणि अवहेलनेच्या चटक्यांसह रिकाम्या हातावर जे काही चार दोन रुपये , खाण्याच्या वस्तू पडतील ते स्विकारुन दोन घासांची सोय करत 'बाल दिन ' साजरा करणारे देवाघरची फुले..अर्थात त्या चिमुरड्यांना कुठे ठाऊक असेल बालदिन. त्यांचं आपलं सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर.. एवढी छोटी जीवनरेषेने बंदिस्त मंडळीच्या ओठी एकच प्रश्न होता तो म्हणजे..बालदिन म्हंजी काय ओ.. दादा.?   बालदिन म्हणजे काय.? तो १४ नोव्हेंबर लाच का साजरा करतात, अशी सर्व माहिती त्यांना आजपर्यंत कुणी सांगितली पण नाही. आणि समजा चुकून कुणी दिलीही असेल तरी वर्षभर लक्षात राहण्याचे काही कारण नाही.. त्यांना ती माहिती करुन घेण्याची गरजही कधी पडली नाही. पण अशा काही मंडळींशी बालदिनाच्या निमित्ताने लोकमत प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यात ही छोटी छोटी चिमुरडी मुले, त्यांचे कुटुंब गाव, नातेवाईक यांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वास्तव्याला येतात. त्यातील काही लोक हे युपी ,बिहारचे आहेत .तिकडे पुरेसा रोजगार नाही, स्वत:च्या हक्काची घरे नाही, शिक्षणाचा अभाव , आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, कमी वयात मुला मुलींचे होणारे लग्न आणि त्यातून त्यांना होणारे अपत्य ही या देशाच्या नागरिकांची दयनीय अवस्था. या सर्व परिस्थितीत अठरा विश्व दारिद्रयाला सोबती घेत ही मंडळी रोजचा दिवस फक्त पुढे ठकलत असतात. हीच यांची दिशा राहिली तर भविष्याविषयी काय बोलणार..         शिक्षणापासून वंचित असलेली ही चिमुरडी बालके वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत जगत राहतात. पुढे मग त्यांचा गुन्हेगारी, अवैध धंदे, चोऱ्या यात उपयोग होवू लागतो. दोन पैशांच्या कमाईसाठी ते रोजचे २४ तास आणि संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेखाली जगू लागतात. काही दिवसांनी ही अल्पवयीन मुले इतकी असंवेदनशील होतात की आपण काय करतोय, त्याचे भविष्यात जीवनावर किती भयानक परिणाम होणार आहे याचे जरासेही भानही त्यांना राहत नाही. परंतु, हा प्रश्न असाच सुरु राहील विना उत्तर कुणी पुढेच आले नाही तर.. कुठेतरी त्या मुलांच्या भवितव्याची पूर्ण नाही पण ५०- ५० टक्के जबाबदारी उचलली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. सामाजिक बांधिलकी , संवेदनशील मन यांनी ही दरी नक्की भरुन येईल.काहीजण अशाच अंधारलेल्या वाटेवर शिक्षणाचा प्रकाशदिवा लावत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मुलांची नावे झळकल्याची उदाहरणे देखील समाजात पाहायला मिळत आहे....  

टॅग्स :Puneपुणेchildren's dayबालदिन