मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:25 PM2020-04-14T15:25:13+5:302020-04-14T15:26:00+5:30

वॉर्डबॉय, परिचारिका आणि कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून येतायत पुढे... 

Chief Minister took a review of the Pune region through video conferencing : Dr. Deepak Mhaisekar | मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर

मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर

Next
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्याचा आढावा

पुणे : पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, त्यामध्ये होत असलेली वाढ, मृत रूग्णांची माहिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना, आवश्यक असलेली मदत आदी सर्वबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सर्व माहिती दिली.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने कोरोना विषाणू आजाराच्या अनुषंगाने वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री यांना दिली. यामध्ये अनेक वॉर्डबॉय, परिचारिका आणि कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून येतायत पुढे येत असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले. यावेळी पुण्यातून पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. 
डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्ह्यात तसेच विभागात ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने असून त्यांना भोजन तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. परप्रांतीय मजुरांनाही भोजन व निवास सुविधा देण्यात आली आहे. अन्न-धान्याबाबत कोणतीही टंचाई नसून भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ उचलण्याचे काम सुरु झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार एप्रिल महिन्याच्या अन्नधान्याचे 91 टक्के वाटप झाले आहेत. खरीप पूर्व हंगामाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी खत, बी-बियाणे याबाबत माहिती दिली. खतांचा साठा पुरेसा असून बी-बियाण्यांबाबत नियोजन करण्?यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांबाबतही आवश्यक ती दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी काही वॉर्डबॉय, परिचारिका, कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून पुढे येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिलकडून अशा वैद्यकीय तज्ञांची माहिती मिळाल्यास त्यांच्या सेवा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी घेता येवू शकतील, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister took a review of the Pune region through video conferencing : Dr. Deepak Mhaisekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.