शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भीमथडी जत्रेचे निमंत्रण; जत्रेतून शरद पवारांचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 12:36 IST

राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार व काश्मीर आदी राज्यातून हस्तकलेच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तुंना पुणेकरांची पसंती

किरण शिंदे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यातील भीमथडी जत्रेला हजेरी लावली. शरद पवारांनी जत्रेतील अनेक स्टॉलवर जात पाहणी केली. तेथील विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेतली. आणि त्यानंतर शरद पवारांनी भीमथडी जत्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत भीमथडी जत्रेत येण्याचे निमंत्रण दिल्याची ही माहिती आहे. 

दरम्यान पुण्यात यावर्षीही मोठ्या दिमाखात १८ व्या भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भीमथडीत असलेल्या विविध दालनातील सिलेक्ट दालनात विविध १३ राज्यांमधील ३१ स्टॉल असून त्यामध्ये महिला बचत गटाच्या व त्या ठिकाणची संस्कृती जपणाऱ्या विविध वस्तू पुणेकरांना आकर्षून घेताना दिसत आहे. राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा,  मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार व काश्मीर आदी १३ राज्यातील, हस्तकलेच्या माध्यमातून बनविलेल्या विविध उपयोगी वस्तुंना पुणेकरांनी पसंती दिली. 

यंदाच्या भीमथडीत  देवराईमध्ये सुमारे १२० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड केली आहे.  देवराईमुळे देशी वृक्षांचे मुबलक बीज तयार होते. देवराई मुळे गावागावात देवराई तयार झाल्यास ऑक्सिजन बँक, निसर्गातील विविध परीसंस्थाना संरक्षण, निसर्गाचा समतोल, किडे मुंग्या यांना आश्रय व खाद्य, शेती उत्पनात वाढ असे विविधांगी फायदे त्याच गावाला मिळतात.  याशिवाय भीमथडीत शबरी  आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांचे स्टॉलमध्ये महाराष्ट्रातील आदिवासींच्या शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, आदिवासींच्या सहकारी संस्था आदींच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिला