राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:33 IST2026-04-12T06:30:19+5:302026-04-12T06:33:23+5:30

Mahatma Phule skill development training centers: महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभर राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मानव संसाधनाचे एक कार्य म्हणून केंद्र शासनाचा म. जोतिबा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यात शुभारंभ होत आहे.

Chief Minister Devendra Fadnavis announces to set up 1,000 Mahatma Phule skill development training centers in the state | राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 जेजुरी (जि. पुणे) - महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभर राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मानव संसाधनाचे एक कार्य म्हणून केंद्र शासनाचा म. जोतिबा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यात शुभारंभ होत आहे. भविष्यात या उपक्रमांतर्गत राज्यात एक हजार प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खानवडी (ता. पुरंदर) येथे केली.

महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या खानवडी येथे फुलेंच्या द्विशताब्दीचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या ज्योती-सावित्री शाळेच्या भव्य इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार, अधिकारी उपस्थित होते. 

शाळेच्या उभारणीची संकल्पना अजितदादांची...
मुख्यमंत्री म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सीबीएससी बोर्ड असणारी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणारी ही राज्यातील पहिली शाळा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतील या शाळेत सध्या २६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
भविष्यात २८० विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि सुमारे १,८४० विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची सोय होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘शाळेच्या उभारणीची संकल्पना अजितदादा पवार यांची होती. त्यांनीच शाळेचे भूमिपूजन केले होते. म. फुलेंच्या जन्मगावी ही शाळा व्हावी, असा त्यांचा आग्रह होता. आज तो पूर्ण झाला आहे.

मंत्री भुजबळ यांचे हेलिकॉप्टर वाहनतळावरच उतरले 
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम स्थळी आले. मात्र, ते वाहनतळावरच उतरवण्यात आले. यामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडाली. भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटला योग्य ती सूचना मिळाली नसल्यामुळे हा प्रकार झाला. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड झाले तेथे पार्क केलेली असंख्य वाहने, शेजारी हाय व्होल्टेज विद्युत तारांचे खांब. सुदैवाने अनुचित घटना घडली नाही.

Web Title : महाराष्ट्र में खुलेंगे महात्मा फुले कौशल विकास के एक हजार केंद्र

Web Summary : महाराष्ट्र में महात्मा फुले कौशल विकास के 1000 केंद्र खुलेंगे। मुख्यमंत्री फडणवीस ने फुले की द्विशताब्दी पर यह घोषणा की। फुले के जन्मस्थान पर एक नए स्कूल का भी उद्घाटन किया गया।

Web Title : Maharashtra to Establish 1000 Mahatma Phule Skill Development Training Centers

Web Summary : Maharashtra will establish 1000 Mahatma Phule skill development centers. The initiative, announced by Chief Minister Fadnavis, coincides with Phule's bicentennial. A new school in Phule's birthplace was also inaugurated.