शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजन आणि माझा डीएनए एकच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 21:00 IST

गँगस्टर छोटा राजनच्या पुतणीने मागितली ५० लाखांची खंडणी

ठळक मुद्देहस्तकाला पकडले रंगेहाथ : गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांकडील तक्रार मागे घ्यावी व दुसऱ्या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी खेडचे माजी उपसभापती यांना ५० लाख रुपयांची खंडणी छोट्या राजनची सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यापैकी २५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेला छोट्या राजनचा हस्तक धीरज साबळे याला खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. धीरज बाळासाहेब साबळे (वय २६, रा. धानोरे, ता. खेड), प्रियदर्शनी निकाळजे (रा. जांभूळकर नगर, वानवडी) आणि मंदार वाईकर (निधिषा सोसायटी, मार्केट यार्ड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खेडच्या माजी उपसभापती राजेश वसंतराव जवळेकर (वय ४८, रा़ भाग्यतारा सोसायटी, कात्रज) यांनी खंडणीविरोधी पथकाकडे फिर्याद दिली आहे.

धीरज साबळे याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी़ व्ही़ क्षीरसागर यांनी धीरज साबळे याला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

छोटा राजन आणि माझा डीएनए एकच  जवळेकर हे धीरज साबळेच्या सांगण्यानुसार प्रियदर्शनी निकाळजे यांना भेटायला गेले होते. तेव्हा प्रियदर्शनी निकाळजे हिने ‘छोटा राजनची मी सख्खी पुतणी आहे. आमचा डीएनए एकच आहे. जीव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून फोन आला तर मी सांगितल्याशिवाय जायचे नाही. मी पैसे पोच झाल्यानंतरच अर्ज मागे घेईन,’ असा दम भरला. यानंतर तिने हाताखाली काम करणाºया एकाला गाडीतून पर्स आणण्यास सांगितले. त्यातून पिस्तुल काढून फिर्यादीवर रोखले. ‘माझे ऐकले नाही तर यातील दहाच्या दहा गोळ्या घालून ठार मारीन,’ अशी धमकी दिली.

धीरज साबळे हा पोलिसांचा मुलगा आहे. त्याचे वडील सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. तर, मंगेश वाईकर हा छोटा राजनचा राइट हँड म्हणून ओळखला जातो. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीच मारामारीचे तीन गुन्हे आहेत. प्रियदर्शनी निकाळजे हिच्याविरुद्ध पुण्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. ०००अभिनेत्री आणि मॉडेल यांचीही होणार चौकशीमराठी अभिनेत्रीने २०१५मध्ये फिर्यादी जवळेकर यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे़ त्यांनी त्याअगोदर तीन ते चार मराठी चित्रपटांत काम केले आहे, तर तिची बहीण मॉडेल म्हणून काम करते़ गेल्या ६ महिन्यांपासून ती मंदार वाईकर याच्याशी संपर्कात आली आहे. पतीने मर्सिडीस कार घेऊन दिली नाही; तसेच आता तिला घटस्फोट हवा असल्याने तिने प्रियदर्शनी निकाळजे हिच्याशी संपर्क साधला़ त्यामुळे आता या दोघीही अडचणीत आल्या असून पोलीस त्यांच्याकडे चौकशी करण्याची शक्यता आहे़

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय