शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवरायांच्या सुरक्षेविषयक धोरणाचा होणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:33 IST

२७ फेब्रुवारी रोजी मराठी अध्यासन आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

श्रीकिशन काळे पुणे : नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापनाविषयीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवता येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठामध्ये शिवरायांचे अध्यासन सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये शिवरायांच्या सुरक्षेविषयी अभ्यास करता येणार आहे.

जेएनयू’मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन तयार झाले आहे. गेल्या काही वर्षांमधील घेतलेल्या प्रयत्नांना यश आले. विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी जेएनयूला दिला होता. मात्र, तेव्हा हे अध्यासन सुरू होऊ शकले नाही. ‘जेएनयू’ मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर त्याला यश आले आहे.

नवी दिल्ली येथील जेएनयूमध्ये, ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरीत केला जाणार आहे. काही निधी मिळालेला आहे.

जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करणारे अध्यासन उभारावे, अशी कल्पना तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. दिल्लीत जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांच्यासोबत मुनगंटीवार यांच्या अनेक बैठका झाल्या. या अध्यासनासाठी अभ्यासक्रम आखणे, विषय मांडणीसाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबतीतील संशोधनासाठी राज्य शासनाने जेएनयू सोबत सहकार्य केले आहे.

मराठी भाषेतून अभ्यासक्रम

या अध्यासनात अंतर्गत सुरक्षा, पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती, गनिमी कावा, किल्ल्यांच्या तटबंदी संदर्भातील रणनीती, मराठा इतिहास या विषयावर संशोधनात्मक कार्य होणार आहे. तसेच मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी) ची सुविधा तसेच मराठा साम्राजाची सैन्य व्यूहरचना, किल्ले व तटबंदी रचना यावरील अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत.

आम्ही २७ फेब्रुवारी रोजी मराठी अध्यासन आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनाचे उद्घाटन होईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्घाटनाला येणार आहेत. - शांतीश्री पंडित, कुलगुरू, जेएनयू, नवी दिल्ली

टॅग्स :Puneपुणेjnu - jawaharlal nehru universityजेएनयूShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEducationशिक्षणStudentविद्यार्थीhistoryइतिहास