बारामती: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला बारामतीन्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. धोपवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत चार वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
प्रकरणातील माहितीनुसार, आरोपी जाधव याने फिर्यादीसह इतर महिलांना “पैशांचा पाऊस पाडून देतो” असे खोटे आमिष दाखवले होते. त्यासाठी अघोरी पूजेचे आयोजन करून महिलांना अनुचित पद्धतीने बसवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले. तसेच पूजेच्या नावाखाली आर्थिक फसवणूकही केल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध शारीरिक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी युक्तिवाद करत सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवले. भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, तसेच जादूटोणा कायद्यान्वये चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गोरख कसपटे, सहायक उपनिरीक्षक अभिमन्यू कवडे, हवालदार रेणुका पवार व न्यायालयीन लिपिक सुनीता कांबळे यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
Web Summary : A fake guru in Baramati received four years imprisonment for defrauding women by promising a rain of money and sexually assaulting them. The court found him guilty under anti-superstition laws, imposing a fine in addition to the jail term.
Web Summary : बारामती में एक ढोंगी गुरु को महिलाओं को पैसे की बारिश का वादा करके धोखा देने और यौन उत्पीड़न करने के लिए चार साल की कैद हुई। अदालत ने उसे अंधविश्वास विरोधी कानूनों के तहत दोषी पाया और जेल की सजा के अलावा जुर्माना भी लगाया।