शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पुण्यात हातसडी (ब्राऊन राईस) च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:32 IST

साधा तांदूळ पॉलिश न करता, पुन्हा अर्धवट बॉईल प्रक्रिया करून तोच ब्राऊन राईस म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे..

ठळक मुद्देसाधा तांदूळ उकडून ‘ब्राऊन राईस’ म्हणून केली जाते विक्रीपोषक व आरोग्यदायी म्हणून मागणीमध्ये वाढ

पुणे: गेल्या काही वर्षांत हातसडी (ब्राऊन राईस) ची मागणी सर्वसामान्य नागरिकामध्ये वाढत आहेत. ब्राऊन राईस पोषक आणि अधिक आरोग्यदायी असल्याने किमंत देखील दोन ते तीन पट्ट अधिक मिळते. याचाच फायदा घेत सध्या बाजारामध्ये साधा राईस अर्धवट उकडून (बॉईल) करून ब्राऊन साईसच्या नावाखाली विक्री केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे जयराज आणि कंपनीचे संचालक व फेडरेशन ऑफ असोशियशनसऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी सांगितले.राजेश शहा यांनी सांगितले की, सामान्य लोकात आरोग्याप्रती जागरूकता कमालीची वाढली आहे. त्यामुळे एक विशिष्ट वर्ग ब्राऊन राईसला प्राधान्य देत आहे. परिणामी ब्राऊन राईसची मागणी सुद्धा वाढत आहे. याच संधीचा वापर करून काही कंपन्या चुकीचा फायदा उचलत आहेत. साधा तांदूळ पॉलीश न करता, पुन्हा अर्धवट बॉईल प्रक्रिया करून तोच ब्राऊन राईस म्हणून ग्राहकांच्या माथी मारत आहेत. थोडे उकड्ल्यामुळे तांदळाच्या दाण्यांचा रंग बदलतो व त्याची त्वचाही गुळगुळीत न राहता ओबडधोबड बनते. अनेक प्रकारचे फसवे दावे मोठ्या प्रमाणात कंपन्या करत आहेत. ब्राऊन राईस हा मिलिंग करतेवेळी तांदळाचे फक्त बाहेरील आवरण काढल्यामुळे व पॉलीश न केल्यामुळे तांदळाच्या दाण्यांवरील बाहेरील थर तसाच शाबूत राहतो. या थरात तांदळातील सर्वाधिक पोषक तत्वे असतात. ते तसेच राहिल्यामुळे ब्राऊन राईस मधील पोषक तत्वे टिकून राहतात ही वस्तुस्थिती आहे. परंतु सध्या काही कंपन्या ब्राऊन राईस विकताना आमच्या तांदळामध्ये निम्नतम म्हणजे ८ ते १० जीआय असल्याचा दावा करतात. परंतू,तो खोटा असतो. अशा प्रकारे जाहिरात करून चुकीचा माल ग्राहकांना जास्त भावात विकतात. देशातील विविध क्षेत्रातील पाहणीनुसार आणि वेगवेगळ््या लॅबोरेटरीमधील तपासण्यांच्या अहवाला नुसार तांदळाचा जीआय ४० ते ५० पर्यंत आढळतो. तर काही कंपन्या आपला राईस फायबरयुक्त व शुगर फ्री असल्याचाही दावा करतात. परंतू तांदूळ मग तो साधा असो किंवा ब्राऊन त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण असते. सेवन केल्यावर त्याचे रुपांतर साखरेत होते. त्यामुळे शुगर फ्री हा दावा सपशेल खोटा आहे. तांदूळ अर्धवट बॉईल केलेला असल्यामुळे तो बिगर पॉलीश नाही. शिवाय तांदळाच्या बाहेरील थरातील ब्रान नसल्यामुळे तांदूळ उच्च फायबर युक्त नसतो.सध्याच्या काळात मधुमेहाच्या (शुगर वाढण्याची) भीती दाखवून फसवणुकीचे प्रकार होत आहेत. ग्राहकांनी खोट्या जाहिरातींना बळी न पडता ब्राऊन राईस खरेदी करताना त्याच्या प्रतीची शहानिशा करूनच खरेदी करावी, असे आवाहन देखील शहा यांनी केले.    

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य