स्वस्तात मस्त पोटपूजा करण्याची पुण्यातील ठिकाणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:42 PM2018-04-04T16:42:10+5:302018-04-04T18:16:18+5:30

पुण्यात भूक लागली असेल तर काळजी करू नका. स्वस्तात मस्त अगदी ३० रुपयांच्या आत तुमचे पोट भरू शकते. विश्वास नसेल बसत तर ही घ्या यादी.

cheap food outlets in pune |  स्वस्तात मस्त पोटपूजा करण्याची पुण्यातील ठिकाणे 

 स्वस्तात मस्त पोटपूजा करण्याची पुण्यातील ठिकाणे 

Next

पुणे : चवदार खाण्यासाठी फक्त खिशात पैसे असणे महत्वाचे नसून स्वस्तात मस्त पदार्थ मिळणारे स्पॉटही माहिती असायला हवेत. पुण्यात तर अशा ठिकाणांना कमी नसून त्यातल्या काही निवडक ठिकाणांचा हा पर्याय. 

गार्डन वडा पाव : इथे १५ रुपयात मिळणारा मोठ्ठा वडापाव तुमचे पोट भरू शकतो. कॅम्प आणि नळस्टॉपला गार्डन वडापाव मिळू शकतो. 

अनारसे सामोसे : अतिशय चवदार असलेला अनारसे सामोसे सदाशिव पेठेतील खाऊगल्लीत मिळतात. हे सामोसे तिखट आणि चटकदार असतात.अवघ्या २० रुपयात इथे सामोसा खायला मिळतो. 

जंगली महाराज रस्त्यावरील फूड ट्रक :जंगली महाराज रस्त्यावर इब्ल्यू शोरुमसमोर संध्याकाळी अगदी छोटासा फूड ट्रक उभा असतो. तिथे घरगुती चवीचे थालीपीठ, बाजरीवडे, सुरळीच्या आणि कोथिंबीरीच्या वड्या मिळतात. 

खत्री भजी : विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून बालगंधर्व रंगमंदिराला लागून असलेल्या खत्री बंधू या गाडीवर मिळणारी भजी प्रसिद्ध असून तिथे ताजा वडापावही मिळतो.इथली चव चाखण्यासाठी दिवसभर गर्दी असते. 

तापडिया, कर्वे रस्ता :कर्वे रस्त्यावरील तापडिया हा गरवारे कॉलेजसमोरचा अड्डा सर्वांनाच माहिती आहे. तिथे दिवसभर गरम वडा पाव, सामोसे, थंडगार मिल्कशेक मिळत असतात. या सर्वांची किंमत २५ रुपयांपेक्षाही कमी आहे. 

शेगाव कचोरी : अस्सल विदर्भातली चव असलेली शेगाव कचोरी नारायण पेठेत मिळते. त्यासोबत मिळणारी लसणाची लाल चटणी केवळ लाजबाब असून तिथे दिवसभर ग्राहकांची वर्दळ असते. एका कचोरीची किंमत १२ रुपये इतकी आहे. 

हत्ती गणपती चौक : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अगदी मागे असलेल्या या ठिकाणी पॅटिस, व्हेज रोल, वडापाव असे पदार्थ पाच रुपयात मिळतात. तर दोन पोळ्या, भाजी, कोशिंबीर आणि मसालेभात असा कॉलेज कॉम्बो पॅक अवघ्या ३० रुपयात मिळतो. 

संतोष बेकारी पॅटिस :आपटे रस्त्यावरील संतोष बेकारी येथे मिळणारे पॅटिस खाण्यासाठी संपूर्ण शहरातून खवैय्ये येत असतात.दुपारी एक ते चार वगळता संध्याकाळी ७ पर्यंत हे ताजे पॅटिस उपलब्ध असतात. १४ रुपयात एक पॅटिस मिळत असून दोन पॅटिसमध्ये पोट भरते. 

Web Title: cheap food outlets in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.