शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तासिका तत्वावरील प्राध्यापकांची मानधनवाढ धूळफेकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:16 IST

गेल्या दहा वर्षापासून राज्यातील महाविद्यालयांमध्ये सीएचबीवर काम करणा-या प्राध्यापकांच्या मानधानात कोणतीही वाढ केली गेली नाही.

ठळक मुद्देसुमारे दोन वर्षानंतर मानधन वाढीबाबत अध्यादेश महाविद्यालयांकडून सहसंचालक कार्यालयाकडून कार्यभार तपासून दिला जात नसल्याची तक्रार संबंधित विषयाचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहणार

पुणे: राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे तासिका तत्त्वारील (सीएचबी)प्राध्यापकांच्या मानधन वाढीबाबत अध्यादेश काढण्यात आला असला तरी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे प्राध्यापकांचा कार्यभार (वर्कलोड) तपासून दिला जात नाही. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पातही यासाठी आर्थिक तरतुद केलेली नाही.  त्यामुळे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधन वाढीबाबत काढण्यात आलेला अध्यादेश केवळ धूळफेक ठरणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.गेल्या दहा वर्षापासून राज्यातील महाविद्यालयांमध्ये सीएचबीवर काम करणा-या प्राध्यापकांच्या मानधानात कोणतीही वाढ केली गेली नाही.त्यामुळे उच्च शिक्षण संचालनालयातर्फे सीएचबी मानधन वाढीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.वित्त विभागाकडून मान्यता मिळत नसल्याने हा प्रस्ताव पडून होता.परंतु,सुमारे दोन वर्षानंतर मानधन वाढीबाबत अध्यादेश काढण्यात आला.मात्र, वित्त विभागाच्या 1 सप्टेबर 2018 रोजीच्या अनौपचारिकत पत्रातील सहमतीस अनुसरून हा अध्यादेश निर्गमित करण्यात आला असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे वित्त विभागाच्या मंजूरीशिवाय आर्थिक विषयाशी निगडीत अध्यादेश काढले जात नाहीत. त्यामुळे अनौपचारिक पत्राचा आधार घेवून काढलेल्या अध्यादेशानुसार सीएचबीच्या प्राध्यापकांचे वाढीव मानधन वित्त विभागाकडून अदा केले जाणार का? अशी शंका प्राध्यापकांकडून उपस्थित करण्यात आली आहे.राज्यातील सर्व महाविद्यालयांचा आकृतीबंध तयार करून राज्य शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला.मात्र,अद्याप त्यास मंजूरी मिळालेली नाही.त्याचप्रमाणे 2017 च्या विद्यार्थी संख्येनुसार तयार झालेल्या आकृतीबंधानुसार वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबत शासनाकडून अद्याप निर्देश प्राप्त झाले नाहीत,असे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.तर सीएचबीच्या प्राध्यापकांची नियुक्ती करण्यापूर्वी विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून संबंधित विषयाचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहणार आहे. मात्र,सहसंचालक कार्यालयाकडून कार्यभार तपासून दिला जात नसल्याची तक्रार महाविद्यालयांकडून केली जात आहे. सध्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सीएचबीच्या प्राध्यापकांना सहा महिन्यातून एकदा मानधन दिले जात होते.परंतु,आता दर महिन्याला मानधन अदा केले जाणार आहे. तसेच प्राध्यापकांचे सीएचबीचे तास 7 वरून 9 पर्यंत वाढविण्यात आले आहेत.महाविद्यालयाची रोष्टर तपासणी केल्याशिवाय किती प्राध्यापक सीएचबीसाठी घेता येतील,हे स्पष्ट होत नाही.त्यामुळे सीएचबी प्राध्यापकांच्या मानधन वाढीचा अध्यादेश केवळ धूळफेक ठरणार असल्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

.............

उच्च शिक्षण विभागाने  सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनवाढीबाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी. त्यासाठी स्वत: सहसंचालक कार्यालयानेच पुढाकार घेवून महाविद्यालयांची आवश्यक तपासणी करावी.तसेच विषयांचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे. त्याचप्रमाणे सीएचबी मानधन वाढीचा अध्यादेश वित्त विभागाच्या अनौपचारिक सहमतीनुसार कसा प्रसिध्द करण्यात आला, याचेही उच्च शिक्षण विभागाने स्पष्टीकरण द्यावे.त्यामुळे प्राध्यापकांमधील संभ्रम दूर होईल.- प्रकाश पवार,अध्यक्ष,शिक्षक हितकारणी संघटना

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकEducationशिक्षण