शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या मोबाईलवरून कात्रज बोगद्याजवळ बोलावले अन् कापले गुप्तांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:19 IST

महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

धनकवडी (पुणे) : प्रेयसीला त्रास देणाऱ्या एका तरुणाचे प्रियकराने गुप्तांग कापण्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१२ रोजी) कात्रज परिसरात घडली. या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो तर महिला बचत गट चालवत आहे. महिलेला आर्थिक गरज असल्याने तिने फिर्यादी काम करत असलेल्या फायनान्स मधून कर्ज घेतले होते. परंतु पुन्हा कर्जाची आवश्यकता असल्याने दोघांमध्ये चॅटींग सुरू होते. या चॅटींगच्या संदर्भात आरोपी महिलेच्या प्रियकराला माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या मोबाईल नंबरवरुन चॅटींग करून फिर्यादीला कात्रज नवीन बोगदा परिसरातील स्वामी नारायण मंदिर येथे बोलावून घेतले. आरोपीसोबत आणखी एक साथीदार होता. या दोघांनी फिर्यादीला मारहाण केली नंतर दुचाकीवर मध्ये बसवून शिंदेवाडी येथील एका सुनसान जागेवर नेले.

गुप्तांग कापून डोक्यात मारहाण केली-

"तु तिला लॉजवर घेऊन जाणार का? तुला बायकांना फसवायला पाहिजे, थांब तुझा ... (गुप्तांग) च कापतो", असे बोलून फिर्यादीस खाली पाडून त्याला पकडून त्यातील एकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीचे गुप्त इंद्रियावरील कातडी काढून तेच हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर त्याला कात्रज परिसरातील एका हॉटेलजवळ सोडले.

भीतीमुळे दिली नाही तक्रार-

तेथून फिर्यादीने आई व भावास बोलावून घेतल्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र आरोपींच्या भीतीमुळे त्याने पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र रुग्णालयातून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला फिर्याद देण्यास भाग पाडल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंकुश कर्चे करत आहेत. आरोपी महिला सराईत गुन्हेगार निलेश वाडकरची पत्नी आहे. काही वर्षांपूर्वी पर्वती परिसरात पुर्व वैमनस्यातून त्याचा खून झाला होता.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीkatrajकात्रज