शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खेड तालुक्यातील चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 19:26 IST

चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाची सरासरी एकूण ४३६ मिलिमीटर १४ जुलै रोजी धरणात केवळ ३८ टक्के इतका असलेला पाणीसाठा ४५ तासांत तब्बल ७० टक्यांवर

चासकमान:- खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगावर सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे ८.७५ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाची सरासरी एकूण ४३६ मिलिमीटर इतकी आहे. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५७५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून तासाला १.८ मेगाव्हॅट वीज निर्मिती सूरू झाली आहे. कळमोडी धरणाच्या आठही दरवाजाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग बाहेर पडत असल्याने भिमनेर खोऱ्यातील मंदोशी,डेहेणे,वाडा,खरोशी,कहू,कोयाळी, यासर्व ठिकाणचे पाणी चासकमान धरणाला मिळत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन ते ९६.९० टक्के भरले आहे. सध्या धरणात ९६.९० टक्के पाणीसाठा झाला असून पाणी पातळी ६४९.१५ मीटर इतकी आहे.तर एकूण साठा २३५.०५ दलघमी असून उपयुक्त साठा २०७.८६ दलघमी आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणात ९२.०६ टक्के पाणी साठा होता. तर पाणी पातळी ६४८.५७ मीटर होती.   मागील वर्षी ता.२१ जुलै याच तारखेला चासकमान धरण लवकरच  ९२.०६ टक्के भरल्याने धरणा मधून ५९९० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आहे होते. परंतु, ह्या वर्षी मात्र पावसाने जून महिना अखेरपर्यत दडी मारल्याने धरण लवकर भरते की नाही अशी शंका निर्माण झाली होती. परंतु १४ जुलै रोजी धरणात केवळ ३८ टक्के इतका असलेला पाणीसाठा ४५ तासांत तब्बल ७० टक्यांवर पहिल्यांदाच पोहचला आहे.    ....................

टॅग्स :KhedखेडDamधरणRainपाऊसriverनदी