शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मळवलीतील रामगुडे सहनिवास गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:08 AM

जामीन मंजूर : संस्था सभासदांची फसवणूक केल्याचे फेर लेखापरीक्षणात निष्पन्न

लोणावळा : सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांच्या हितास बांधा पोहोचवत संस्थेची जागा स्वत:च्या व पत्नीच्या नावे करणे, संस्थेतील मोकळी व सुखसोयींची जागा परस्पर विकणे, भूखंडाची बेकायदा विक्री करणे, असे अनेक प्रकार करत सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाटण मळवली (ता. मावळ) येथील रामगुडे सहनिवास क्रमांक २ सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे अध्यक्ष महेशतुकाराम रामगुडे (रा. बोरीवली पूर्व, मुंबई) यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेश सुदाम भुजबळ यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

रामगुडे गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आनंद आळशी व इतर १८ जणांनी रामगुडे गृहनिर्माण संस्थेचे सन २०११ ते २०१६ या कालावधीमधील फेर लेखापरीक्षण करण्याची मागणी पुणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ३० एप्रिल २०१७ रोजी केला होता. यानुसार व जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वे लेखापरीक्षक भुजबळ यांनी संस्थेचे फेर लेखापरीक्षण केले असता रामगुडे यांनी महाराष्ट्र सह संस्था अधिनियम १९६० व ६१ च्या कलम ४, १२ व १० अन्वेय तरतुदीचे पालन न करता संस्थेची नोंद करत सभासदांच्या हिताला बाधा आणत त्यांची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर १८ आॅगस्ट २०१८ रोजी लेखापरीक्षक भुजबळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महेश रामगुडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

फिर्यादीमध्ये भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्था नोंदणी प्रस्तावामध्ये नमूद केलेली जमीन धारणा क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ७२४.४ चौरस मीटर असून, त्यापैकी १७ हजार २६४.७९ चौरस मीटर क्षेत्र हे सुखसोयीकरिता राखीव आहे. या राखीव क्षेत्रापैकी ४ हजार ३०२.९९० चौरस मीटर क्षेत्र रामगुडे यांनी जिल्हाधिकारी तसेच मावळ तहसीलदार यांची परवानगी न घेता १० जणांना बेकायदा विकत त्यांची फसवणूक केली आहे. तर १२ हजार २०७.१४ चौरस मीटर मोकळ्या जागेपैकी ५०१.४५५ चौरस मीटर जागेची तीन सदस्यांनी विक्री केली.संस्थेच्या आवारातील मोकळी जागा व सुखसोयीची जागा ही संस्थेच्या म्हणजेच सर्व सभासदांच्या मालकीची असताना संस्था अध्यक्ष रामगुडे यांनी या जागा स्वत:च्या नावे ठेवून सभासदांची फसवणूक केली. रहिवासी क्षेत्र असलेल्या जागेवर अनेक प्लॉट चुकीच्या पद्धतीने करत त्यांची बेकायदा विक्री केली तर काही स्वत:च्या नावावर ठेवले. यामुळे अकृषक आदेशाचे उल्लंघन व संस्था सभासदांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचा ठपका महेश रामगुडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तो तपासाकरिता पुणे ग्रामीणच्या विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली. याप्रकरणी रामगुडे यांना जामीन मंजूर झाला असून, दर रविवारी हजेरीकरिता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे