शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

पुणे जिल्ह्यात आता दर महिन्याला होणार फेरफार अदालत : डाॅ.राजेश देशमुख यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 11:35 AM

जिल्ह्यात फेरफार अदालतमध्ये एकाच दिवसांत 4243 नोंदी निर्गत 

पुणे :  जिल्हयात बुधवारी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच महसुल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे एकाच दिवसांत तब्बल 4243 नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोना संकट, लाॅकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या निवडणुकांमुळे  शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या नोंदीचे, उदा.इकरार, बैंक बोजे , वारस तसेच खरेदीच्या नोंदीचे कामकाज मोठया प्रमाणावर प्रलंबित होते. यामुळेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी राबविण्यात येणा-या महाराजस्य अभियानाचा भाग म्हणून प्रलंबित असणा-या विविध प्रकारच्या नोंदी मोहीम स्वरुपात निर्गत करण्यासाठी बुधवार रोजी जिल्हाभर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीचे पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हा स्तरावरुन संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या होत्या.

संबधित संपर्क अधिकाऱ्यांमार्फत अशा फेरफार अदालतींचे परिणामकारक पर्यवेक्षण करण्यात आले. या फेरफार अदालतींच्या दिनांक व ठिकाणाविषयी गावोगावी व्यापक प्रसिध्दी देण्यात आली . या फेरफार अदालतीमध्ये विविध प्रकारच्या नोंदी निर्गत करणेकामी आवश्यक कागदपत्रासह संबंधित पक्षकारांना बोलावून त्यांच्या प्रलंबित नोंदी या जागेवर निर्गत करण्यात आल्या.

सात बारा अद्यावत करणेकामी जिल्हयातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांना Digital signature Certificate (DSC) ऐवजी बायोमॅट्रिक डिव्हाईस खरेदी करण्यात आले असून, त्याप्रमाणे वाटप करण्यात येत आहे. नोंदी मंजूर करणेकामी खरेदी करण्यात आले आहेत. तसेच ज्या नोंदीचे अर्ज तलाठी स्विकारणार नाहीत अशा नोंदीबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात घेणेकामी स्वतंत्र कक्ष उभारणार आहे. तसेच PDE (ई-हक्क प्रणाली) प्रणाली द्वारे नागरिक, खातेदार घरबसल्या नोंदीचे अर्ज करु शकतात.या साठी pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर वारस, बोजा, इकरार, बोजा कमी करणे, मयताचे नाव कमी करणे, अ.पा.क कमी करणे या फेरफार प्रकाराचे नोंदीसाठीचे अर्ज करु शकतात.पुणे जिल्हयात या सुविधेचा वापर ३७२ नागरिकांनी घेतला आहे.-------पुणे जिल्हयामध्ये ९५.१२० नोंदी नव्याने घेण्यात आल्या व ८८,११६ नोंदी निर्गत करण्यात आल्या. जिल्हयामध्ये आतापयंत ७/१२ व ८ अ नागरिकांना पेमेंट गेटवे मधन डिजिटली साईन उपलब्ध आहेत. ऑक्टोबर २०२० ते आजअखेर ३.८८,२८५ इतके ७/१२ व १,६९.६९७ इतके ८ अ व ७२,२८१ फेरफार वितरीत करण्यात आले असून यापोटी आतापर्यंत शासनास रक्कम ३१,५१,३१५ प्राप्त झाली आहे.-------जिल्ह्यात तालुकानिहाय निर्गत झालेले फेरफार हवेली - 374,  पिंपरी-चिंचवड- 255, शिरूर- 408, आंबेगाव- 414, जुन्नर-353, बारामती - 704, इंदापूर- 324, मावळ - 236, मुळशी- 106, भोर - 138, वेल्हा - 36, दौंड- 453, पुरंदर-;219, खेड- 243 , एकूण- 4243 ------

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीCourtन्यायालय