केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल; या पर्यायी मार्गाचा वापर करा

By नारायण बडगुजर | Updated: February 21, 2025 16:53 IST2025-02-21T16:52:50+5:302025-02-21T16:53:54+5:30

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

Changes in traffic due to Union Home Minister Amit Shah's visit; | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल; या पर्यायी मार्गाचा वापर करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल; या पर्यायी मार्गाचा वापर करा

पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता म्हाळुंगे गाव, बालेवाडी येथील वाहतुकीत शनिवारी (दि. २२) दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. या कार्यक्रमात २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तसेच दहा लाख लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.

Web Title: Changes in traffic due to Union Home Minister Amit Shah's visit;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.