MPSC परीक्षा पद्धतीत बदल! २०२५ पासून नवीन नियम लागू, कॅबिनेटमध्ये होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 14:49 IST2023-01-31T14:45:56+5:302023-01-31T14:49:04+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद...

MPSC परीक्षा पद्धतीत बदल! २०२५ पासून नवीन नियम लागू, कॅबिनेटमध्ये होणार निर्णय
पुणे : २०२३ पासून होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार होती. गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थींनी 2023 पासून होणारी वर्णनात्मक परीक्षा रद्द करून ती पद्धत २०२५ पासून लागू करावी अशी मागणी केली होती. यासाठी परीक्षार्थींनी राज्यभरात आंदोलनेही केली होती. आज पुण्यात साष्टांग दंडवत आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांनी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत विषय मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. राज्यसेवा आयोगाने अजून याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढलेले नाही.
पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्षापासून लेखी पद्धतीने करावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन#MPSCpic.twitter.com/J6rqYTyWpy
— Lokmat (@lokmat) January 31, 2023