पुणे : भाजपने राज्यात 1 कोटी 51 लाख सदस्य जोडणीचे अभियान सुरू केले असून फडणवीस यांच्या नेतृत्वात हे अभियान पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आज पुण्यात पार पडलेल्या कार्यशाळेत त्यांनी 12 हजार पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या भाजपचे 1 कोटी 16 लाख सदस्य असून, ते वाढवून 1 कोटी 51 लाख करण्याचे लक्ष्य त्यांनी जाहीर केले. भाजपने राज्यात पुन्हा एकदा 'घर चलो' अभियान सुरू केले आहे. यासाठी 36 कार्यकर्ते घरोघरी भेट देणार असून, 3 लाख कार्यकर्त्यांना अॅक्टिव्ह मेंबरशिप दिली जाणार आहे. बावनकुळे म्हणाले की, "भाजप ही एकमेव पार्टी आहे जी सदस्य नोंदणीसाठी व्यापक अभियान राबवत आहे." ओबीसी आरक्षण आणि निवडणुकासुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असून, कोर्टाने मागितलेली सर्व माहिती आम्ही सादर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. 13 हजार जागांवर निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. महापालिका निवडणुकीला विशेष महत्त्व असून, महायुती संपूर्ण पालिका निवडणूक एकत्रित लढणार आहे. "महायुती सर्व नगरपालिका, महानगरपालिका आणि पंचायत समित्या जिंकेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योजना आणि बजेटबाबत स्पष्टीकरण'लाडकी बहीण' योजनेसाठी वेगळे बजेट देण्यात आले असून, कोणतीही योजना बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "राज्यातील कुठलीच योजना बंद होणार नाही, उलट आम्ही योजना वाढवणारे आहोत," असे त्यांनी सांगितले. शिवभोजन योजनेसह सर्व योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धस-मुंडे भेट आणि मुंडे राजीनामा धस-मुंडे यांच्या भेटीबाबत बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, यावर ते अधिक भाष्य करणार नाहीत. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतील, असेही त्यांनी सांगितले. भाजपने सदस्य जोडणीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघटन बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आगामी निवडणुकांसाठीची तयारीही सुरू केली आहे.
सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:11 IST