शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर आझाद पुण्याकडे रवाना ; पुण्यात पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 18:21 IST

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे मुबंईकडून पुण्याकडे येण्यास निघाले असून ते पुण्यात ज्या हाॅटेलमध्ये थांबणार आहेत, तेथे माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणेभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुंबईतील मनाली हाॅटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले हाेते. पाेलीस त्यांना विमानाने उत्तरप्रदेशला पाठविणार अशी चर्चा सुरु असताना आता आझाद पुण्याकडे येत आहेत. दरम्यान पुण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माेठा पाेलीस बंदाेबस्त आझाद ज्या ठिकाणी सभा घेणार हाेते तेथे आणि ते ज्या हाॅटेलमध्ये उतरणार आहेत तेथे तैनात करण्यात आला आहे. 

    चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार हाेते. परंतु पाेलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हाॅटेलमध्ये थांबले हाेते, त्या हाॅटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली हाेती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आराेप आझाद यांनी केला हाेता. आज संध्याकाळी पुण्यातील एस एस पी एम एस च्या मैदानावर त्यांची सभा हाेणार हाेती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली हाेती. परंतु पाेलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली. तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सभा घेणार हाेते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तरप्रदेशला पाठविण्यात येईल असे सांगितले जात हाेते. परंतु आझाद यांनी पुण्याला जाणारच असा निर्धार केला हाेता. त्याप्रमाणे आता ते पुण्याकडे येण्यास रवाना झाले आहेत. 

    दरम्यान आझाद यांची सभा हाेणार हाेती त्या एस एस पी एम एस मैदानावर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. त्याचबराेबर कॅम्प भागातील सागर पॅलेस या हाॅटेल बाहेर देखील पाेलीस तैनात करण्यात आले आहे. पुणे पाेलिसांनी आझाद यांना पुण्यात येण्यापासून अडवणार नाही परंतु त्यांना सभा घेण्यास परवानगी देणार नसल्याचे म्हंटले आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आझाद पुण्यात पाेहचण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर अाजादPuneपुणेBhim Armyभीम आर्मीPoliceपोलिस