शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Chandrakant Patil : "संभाजीराजेंनी चालढकल केली तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजप पाठिंबा देईल.."  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 15:35 IST

छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी, तर मिळणार नाही ना, याचा विचार करणे त्यांनी गरजेचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहे. तसेच त्यांनी राज्यातील विविध वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी देखील घेतल्या. तसेच शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी रायगडावरून त्यांनी राज्य सरकारला कोल्हापूरात मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजेंनी मोर्चाबाबत चालढकल केली तर भाजपा मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जो कोणी पुढाकार घेईल, त्याच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण व संभाजीराजे यांच्या भूमिकेवर भाष्य केले. पाटील म्हणाले, खासदार संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार तर दुसऱ्यावेळी लाँग मार्च काढणार अशी भूमिका घेत आहे. मात्र, या घडीला १६ जूनला कोल्हापुरमध्ये मराठा मोर्चा निघणार का, याची शाश्वती देता येत नाही. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे. संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला या मोर्चाला माझा पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांनी आपल्या निर्णयावरून माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. दुसऱ्या कुणीही कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला तर त्याला भाजपा पाठिंबा राहील देईल. 

पाटील पुढे म्हणाले, आरक्षणाच्या बाबतीत जर वेळ निघून गेली तर मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी, तर मिळणार नाही ना, याचा विचार करणे त्यांनी गरजेचे आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात चालढकल झाली, तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. असं झालं तर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपा