शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! गुन्ह्यांचे 'शतक' ठोकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 20:57 IST

लॉकडाऊन सुरु झाला त्याचदिवशी २४ मार्च २०२० रोजी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता..

पुणे : १९८४ पासून गुन्हेगारीत असलेल्या व १०० वर गुन्हे केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजू बाबुराव जावळकर (वय ५५, रा. खानापूर, सिंहगड रोड) असे त्याचे नाव आहे.आता त्याच्याकडून ट्रक, टेम्पो व दुचाकी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टेम्पो चोरीला गेला होता. त्याचा तपास सीसीटीव्हीवरुन करीत असताना पोलीस नाईक तुषाभ भिवरकर व पोलीस शिपाई विक्रांत सासवडकर यांना राजू जावळकर हा खेड शिवापूर टोलनाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला तेथे पकडले. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजल्यावर त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून ७ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे. चंदननगर, खडक, वारजे येथील चार टेम्पो चोरुन त्याने ते दिनेश रामसिंग वसावा (वय २४, रा. अंकलेश्वर, गुजरात) या भंगार विक्रेत्याचा विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या गाड्यांंचे इंजिन पुराव्याकामी जप्त केले आहे.याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, राजू जावळकर हा १९८४ पासून चोऱ्या करत आहे. त्याच्याकडून आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी किमान ९५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी काही गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षाही लागली आहे. देशात लॉकडाऊन सुरु झाला त्याचदिवशी २४ मार्च २०२० रोजी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता. अनलॉक सुरु होताच तो पुन्हा चोऱ्या करु लागला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक सचिन जाधव, हवालदार अजित धुमाळ, तुषार भिवरकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अतुल जाधव यांनी केली आहे.़़़़़़़़एकाच प्रकारच्या करायचा चोऱ्याराजू जावळकर हा प्रामुख्याने एकाच प्रकारच्या चोऱ्या करतो. दुचाकी, टेम्पो, पिकअ‍ॅप व्हॅन तो प्रामुख्याने चोरतो. वाहन चोरल्यानंतर त्या वाहनांचे पार्ट कटींग करुन तो भंगार विक्रेत्यांना विकत असे. इंजिनावरील इंजिन नंबर खोडून पुरावा नष्ट करीत असे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक