शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

पुणे परिसरात दाट धुक्याची शक्यता; वाहनचालकांसाठी सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 10:13 PM

पुणेकरांसाठी अगदी हिल स्टेशनसारखे वातावरण

पुणे : संपूर्ण ढगाळ वातावरण,अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकरांना सोमवारी( दि. १४) हिल स्टेशनसारखे वातावरण अनुभवायला आले. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पुणे शहर व जिल्ह्यात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी होणार असून वाहनचालकांसाठी हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. दृश्यमानता कमी असल्याचे काही अंतरावरील वाहने दिसू शकणार नाही. त्यामुळे महामार्गावरुन वेगाने जाताना पुढील अवजड वाहन न दिसल्याने त्याला पाठीमागून धडकण्याची शक्यता वाढते. रस्त्यावरुन जाताना विशेषत: महामार्गावरुन जाताना वाहनचालकांनी आपल्या वाहनाची गती कमी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात आज सकाळपासूनच दाट धुके, ढगाळ हवामान आणि अधूनमधून येणारा पाऊस असे वातावरण दिसून येत होते. दिवसाच्या तापमानात मोठी घट झाल्याने पावसाबरोबरच थंडीही जाणवत होती. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यात सोमवारी आणखी घट होऊन ते २३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने कमी आहे. त्याचवेळी रात्रीच्या तापमानात वाढ झाली असून सोमवारी सकाळी किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ते सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

शहरात आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अधून मधून पावसाची एखादी सर जोरात येत होती. दुपारपर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. दुपारनंतर सूर्यदर्शन झाले तरी आकाशात पुन्हा ढगांची गर्दी होत होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ५ मिमी तर लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली.

शहरात मंगळवारी आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनweatherहवामान