शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik: 'जे स्वतःला चाणक्य समजतात, त्यांच्यावर मात करणारे शरद पवार हेच 'चाणक्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 17:18 IST

शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस कुणीही स्वप्नात पहिले नव्हते. तशीच परिस्थिती देशात आहे

पुणे : पुण्यात औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी मलिक यांनी शरद पवार यांचे भरभरून कौतुक करण्याबरोबरोच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ''शरद पवार हे असे चाणक्य आहेत, जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांच्यावर मात केली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''  

''शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस कुणीही स्वप्नात पहिले नव्हते. तशीच परिस्थिती देशात आहे. बरेच लोक एकत्र येतील अशी कधी चर्चा होत नाही. या सर्वांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. सर्वांना एकत्र आणायचा आहे त्या दृष्टीने पवार काम करत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

''देशात प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्याप्रमाणे युपीएच्या बैठका होणे आवश्यक आहे त्या होत नाहीत. त्यामुळे ममता दीदी, सपा, टीआरएस, आरजेडीसह दक्षिणेतील पक्षांची मोट बांधून काँग्रेस सकट एक मोर्चा तयार करायचा आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करून हा मोर्चा काम करेल. संपूर्ण देशात सध्या भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरातील भाजपविरोधकांची मोट बांधण्याचं काम शरद पवार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.'' 

आता देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार

''देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, एनडीए मध्ये कोणीही शिल्लक राहत नाही, एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाला आहे. देशातल्या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांनी घेतला आहे. ममतादीदीसोबत त्याच विषयावर चर्चा झाली आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन मोठी आघाडी निर्माण करून देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. त्याची चिंता भाजपला सतावत आहे.'' 

टॅग्स :Puneपुणेnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा