शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सदानंदाच्या जयघोषात जेजुरीत चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात, संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:10 IST

येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत बालदारीत करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली....

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आजपासून चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून पुढील सहा दिवस हा उत्सव जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होत आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत बालदारीत करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.

पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धरण करून चंपाषष्टीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसात खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणूनही साजरा केला जातो. उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदिरात पाकाळणी करण्यात आली. मार्तंड भैरव मूर्तीला दही, दूध व तेलाने स्नान घालण्यात आले. सभोवताली गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मिरवणुकीने मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिणेनंतर बालदारीत उत्सव मूर्तींना आणण्यात आले. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तीची स्थापना करून समोरच दुपारी १२:३० वाजता शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते घट बसवण्यात आले. यावेळी वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात व सनई चौघड्याच्या सुरेल वादनात देवांची महाआरती, भंडार खोबऱ्याची उधळण तसेच पुष्पवृष्टीही करण्यात आली. देवाचे मानकरी, पुजारी सेवक वर्गाकडून उत्सवमूर्तींना सुवर्ण व चांदीचे दागिने चढविण्यात आले.

मार्तंड देवसंस्थान, जयमल्हार चंपाषष्टी प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गाभाऱ्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. यावेळी मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडे, अभिजित देवकाते, तसेच सेवेकरी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दिडभाई, देवल बारभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे आदींनी सहभाग घेतला होता. उत्सवाचे नियोजन देवाचे सेवेकरी, पुजारी मानकरी मंडळाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणे