वेगळ्या कौलामुळे राष्ट्रवादीपुढे आव्हान
By Admin | Updated: June 23, 2014 22:49 IST2014-06-23T22:49:48+5:302014-06-23T22:49:48+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही एका सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली.

वेगळ्या कौलामुळे राष्ट्रवादीपुढे आव्हान
>पुणो : हवेली आणि मुळशी या दोन मतदारसंघांच्या विभाजनातून निर्माण झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही एका सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली. शहरी भागात पुण्यातील जुन्या पेठांमधून आलेला वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. पारंपरिक मानसिकता झुगारून नवे चित्र निर्माण करण्याची क्षमता असलेल्या या वर्गावर भावी उमेदवारांची भिस्त असेल.
7 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या मतदारसंघात ग्रामीण पाश्र्वभूमी असलेली 43 गावे, वाडय़ा-वस्त्यांचा समावेश आहे. शहरी भागात 18 वॉर्ड म्हणजे 9 प्रभाग आहेत. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे 12, मनसेचे 4, सेना-भाजपाचे प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आले. मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे अकस्मात
निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या प}ी
हर्षदा या मनसेकडून न लढता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर उभ्या राहिल्या. त्यांना भाजपाचे भीमराव तापकीर यांच्याकडून हार पत्करावी लागली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही दोन वेळा हा मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटला. या मतदारसंघात विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हाही पक्षांतर्गत धुसफूस होतीच. त्यामुळे रमेश
वांजळे अनपेक्षिपणो निवडून
आले होते. राष्ट्रवादीच्याच काहींनी मदत केली.
लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघाच्या काही भागांत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात नवख्या महादेव जानकर यांना आघाडी मिळाली होती. दोन्ही काँग्रेसची आघाडी असली, तरी वर्षानुवर्षे असलेल्या स्थानिक वादावादीतून आघाडीचा धर्म खरोखर पाळला जातो की नाही, हे तपासावे लागेल. अप्रत्यक्ष बंडाळी रोखण्याचे आव्हान मोठे आहे. मनसेच्या
रूपाने तिरंगी लढत होण्याची
शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा कोणताही धोका न पत्करता ज्याला संधी मिळेल त्याच्यासाठी एकदिलाने काम करण्याच्या आणाभाका घेणो सहा महिन्यांपासून सुरू केले आहे.
भाजपाकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे पुन्हा इच्छुक आहेतच. मतदारसंघ शिवसेनेकडे यावा, यासाठी विलास मते, राजाभाऊ रायकर प्रयत्नशील आहेत.
मनसे पुन्हा एकदा ताकद लावण्याचा प्रय} करेल. वसंत मोरे, राजाभाऊ लायगुडे या पक्षातर्फे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीमधील इच्छुकांची संख्या यापूर्वीच्या दोन निवडणुकांसारखीच लक्षणीय आहे. काका चव्हाण, दिलीप बराटे,
विकास दांगट पाटील, दत्ता धनकवडे हे इच्छुक आहेत.( प्रतिनिधी)