कार-बस अपघातात चौैघे जखमी
By Admin | Updated: January 23, 2017 02:25 IST2017-01-23T02:25:44+5:302017-01-23T02:25:44+5:30
कारने बसला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

कार-बस अपघातात चौैघे जखमी
मंचर : कारने बसला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर मंचर गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे झाला.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारने (एमएच ०९ बी एक्स ७९१२) बसला (एमएच १२ के क्यु २९४३) मागून धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला.
कारचालक तुकाराम हरिभाऊ कांबळे (वय ४० रा. शेबहुनी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर), महिपती गोविंद साळुंखे (वय ६५ रा. बजागेवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर), सुनील विठ्ठल किर्ते (वय ४३ रा. सातारा कराड) हे गंभीर जखमी झाले तर सुरेश तुकाराम मानकर (वय ४६ रा. मलकापूर) हे किरकोळ
जखमी झाले.