शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी अचारसंहितेच्या कचाटयात; नवीन शैक्षणिक वर्षात मुलींना लस मिळणार

By राजू हिंगे | Updated: April 21, 2024 16:03 IST

लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार होती

पुणे : पुणे महापालिकेच्या  शाळेतील आठवी आणि नववीच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस दिली जाणार होती. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने २ हजार ५०० सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी करण्याबाबतची  प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पण राज्य सरकारच्या उदासीन भुमिका आणि आचारसंहितेमुळे पालिकेला ही लस खरेदी करता येणार नाही.  त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरच मुलींना ही लस मिळू शकणार आहे.  स्त्रियांमध्ये आढळणारा हा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.  कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. पालिकेच्या आरोग्य  विभागाकडून लस खरेदीसाठी जानेवारी महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी हा निविदा भरण्याचा अंतिम कालावधी होता. ही लस राज्य सरकार कडूनच खरेदी करण्यात येणार होती. दोन वर्षासाठी लस या माध्यमातून घेण्यात येणार होती. मात्र महापालिकेने सगळी प्रक्रिया पूर्ण करून देखील सरकार कडून कसलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. जेव्हा सरकारला वेळ मिळाला तेव्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे सरकार कडून आचारसंहितेचे कारण देत खरेदी प्रक्रिया रखडवून ठेवण्यात आली. लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार होती. पहिल्या टप्प्यात नववीतील आणि त्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलींनाही लसीकरण करण्यात येणार होते. लस खरेदी झाली असती तर मार्च चा शेवटचा आठवडा किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हे लसीकरण केले जाणार होते. मात्र आता आचारसंहिता झाल्यानंतरच लस खरेदी करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाHealthआरोग्यcancerकर्करोगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका