शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारनंच काळजी घेण्यास सांगितलंय; भाजप नेत्यांनी माहिती करून घ्यावं - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 13:50 IST

परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल.

ठळक मुद्देशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन सुरु

पुणे : मंदिरं उघडण्याबाबत राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत. कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. पण मंदिरांचा विचार का केला जात नाही. असा सवाल इतर राजकीय पक्ष उपस्थित करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य सरकारकडे मंदिरत उघडण्याबाबत मागणीही केलीय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पवार म्हणाले, सध्या राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल. 

''केंद्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा अशी त्यांनी सांगितलंय. आम्हालाही नागरिकांच्या भावनांचा आदर आहे. सध्या राज्यात मंदिर उघडण्याबाबत भाजप आंदोलन करतं आहे. त्यांनी केंद्राने दिलेल्या सूचनांची माहिती करून घ्यावी. असंही ते यावेळी म्हणाले आहेत.''   

सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन

पुणे शहर सोडलं तर ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्या भागातील नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ५ तालुक्यात रुग्ण अधिक आहेत. त्यामध्ये शाळा सुरु करणे हे सरकरसमोरील आव्हानच असणार आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही पवार म्हणाले.    

इंधन दरवाढीबाबत केंद्रावर टीका 

दहा महिन्यापासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र, मोदी सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. हे जनतेचं दुर्दैव आहे. अशी टीका करतानाच इंधन दरवाढीवरुन अजित पवार यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. ते नियंत्रित करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, असी टीका अजित पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेEducationशिक्षण