‘जलयुक्त शिवार’ कामाची केंद्रीय समितीकडून पाहणी
By Admin | Updated: February 16, 2016 01:29 IST2016-02-16T01:29:28+5:302016-02-16T01:29:28+5:30
भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे लोकसहभागातून जलयुक्त शिवारांतर्गत केलेल्या पाणलोटाच्या कामाची पाहणी केंद्रीय समितीने सोमवारी (दि. १५) केली.

‘जलयुक्त शिवार’ कामाची केंद्रीय समितीकडून पाहणी
सुपे : भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे लोकसहभागातून जलयुक्त शिवारांतर्गत केलेल्या पाणलोटाच्या कामाची पाहणी केंद्रीय समितीने सोमवारी (दि. १५) केली.
भोंडवेवाडी येथे सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान केंद्रातील १२ खासदारांच्या समितीसह ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. पी. वेणुगोपाल, चिंतामण वणगा, लाडू किशोर श्वेन, हरिचंद्र चव्हाण, जुगलकिशोर शर्मा, डॉ. यशवंत सिंग, डॉ. महेंद्रनाथ पांडे, विजयकुमार हन्सडक, डॉ. विजयलक्ष्मी साधू, महेंद्रसिंग माहरा, कनकलता सिंग, गुलाम रसूल बल्लावी, अभिजित
कुमार, बी. विशाला, सतीश कुमार, रविकांत प्रसाद सिन्हा, व्ही.
श्रीनिवासन, या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे आदींसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, उपशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे, प्रांत अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर आदी उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश भोंडवे यांनी प्रास्ताविक केले.
(वार्ताहर)