शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

"मराठा आरक्षण हा राज्याच्या सूचीतला विषय ; त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही" ; चंद्रकांत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:00 IST

राज्य सरकारने सारथी संस्थेची वाट लावल्याचाही आरोप

ठळक मुद्देराज्य सरकारने आता हम करे सो कायदा धोरण सुरु केले आहे.

पुणे: मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी मोदींची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही. असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्यात क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या मुद्द्यावरून ब्राम्हण, मराठा समाज डोळ्यासमोर ठेवून अमृत महामंडळाची घोषणा केली. त्यांनतर त्याची सर्व फाईल पूर्ण झाली. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी याबाबत पत्रही लिहिले होते. पण कदाचित कोव्हिडंमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी उत्तर दिले नसल्याचे पाटील त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने सारथी संस्थेची वाट लावली 

मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. आरक्षणाचा मुद्दा खूप वर्षांपासून चालतो आहे. सरकारला आरक्षण देण्याबाबत अनेक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागत होते. ते मिळत नसल्याने त्यावर मलमपट्टी होईल. म्हणून काही योजना चालू केल्या. त्यामध्ये सारथी संस्थेचाही समावेश होता. मात्र त्यानंतर सारथीचे नाव कुठेही दिसून आले नाही. सत्तेतील राजकीय नेते संस्थेबद्दल विचारणा केली असता. एकमेकांकडे बोट दाखवू लागले. सारथी नावाला स्थापन झाली. मात्र आता तिची वाट लावून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

भाजपचा आरक्षणाच्या सकारात्मक निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा 

पाच तारखेला विनायक मेटे मोर्चा काढणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत जे काही सकारात्मक आणि रचनात्मक निर्णय होतील. त्यात भाजप पूर्णपणे ताकदीने उभे असेल. असे बोलत सारथीला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पुढे पाटील म्हणाले,  कोरोनाचा विचार करून वेगवेगळ्या स्वरूपात दहावी, बारावीची परीक्षा झालीच पाहिजे. सध्याच्या सरकारचे हम करे सो कायदा असे धोरण आहे. अशी टीकाही पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा