शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला

By नितीश गोवंडे | Updated: June 1, 2023 15:51 IST

महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली

पुणे: महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली. मध्य रेल्वेचा अग्रदुत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. पुणे-मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे रुळावर धावणारी ही पहिली डिलक्स रेल्वे होती. या दख्खनच्या राणीने आज (१ जून २०२३) ९४ व्या वर्षात पदार्पण केल्याने सकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात या क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे या रेल्वेच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकात पाटील, स्टेशन मास्तर मदनलाल मीना, सहायक स्टेशन मास्टर सुनील ढोबळे, जनसंपर्क अधिकारी अजय कुमार यांच्यासह रेल्वेच्या अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रेल्वे स्थानकाच्या फलाट  क्रमांक १ वर ‘डेक्कन क्वीनला ९४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे लिहिलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तुतारी, ढोल-ताशाच्या गजरात ९४ किलोचा शाकाहारी केक कापून या रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना तो देण्यात आला. यावेळी संपूर्ण रेल्वेला सजवण्यात आले होते. काही हौशी महिलांनी डेक्कन क्वीनसाठी हौशीने कॅडबरी पासून बनवलेले केक देखील आणले होते. आज सकाळी पाच वाजल्यापासून असंख्य प्रवासी जणू आपल्या घरातील कार्य आहे, अशा लगबगीत दिसून आले.

रेल्वे फलाटावर येतात, प्रवाशांसह अन्य रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांनी डेक्कन क्वीन सोबत सेल्फी घेत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. काळानुसार डेक्कन क्वीनमध्ये अत्याधुनिक बदल करण्यात आले असले, तरी पुणेकरांसोबत या रेल्वेची जोडलेली नाळ मात्र तशीच आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेचे पूजन करून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

''दरवर्षी मी पुढाकार घेऊन डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करते. आज या रेल्वेने ९४ व्या वर्षात पदार्पण केले याचा अत्यानंद आहे. येत्या काही वर्षात ही रेल्वे १०० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आजपासूनच मी त्यासाठीच्या तयारीला लागले आहे. माझ्यासह या रेल्वेवर प्रेम करणारे अनेक प्रवासी आज रेल्वे स्टेशनवर हजर होते. या रेल्वेतील पूर्वीप्रमाणे पॅन्ट्रीकार फक्त सुरू करण्यात यावी, एवढीच आमची रेल्वे प्रशासनाकडे विनंती आहे. - हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप'' 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीchandrakant patilचंद्रकांत पाटीलSocialसामाजिक