शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सण, उत्सव साधेपणाने साजरे करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 17:18 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत.

बारामती - बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा कोणताही विलंब न होता तत्काळ मिळाल्या पाहिजेत. कोरोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये जे काही सण, उत्सव येतील ते साधेपणाने व गर्दी न करता साजरे करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी केले.कोरोना बाबतची आढावा बैठक  बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  त्यावेळी ते बोलत होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा मिळण्यास रूग्णांना त्रास होऊ नये, अशा सूचना  त्यांनी दिल्या.  कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून  गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग, पुणे) संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, अधिष्ठाता डॉ. तांबे, डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, संभाजी होळकर, किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव  आदी  उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारGaneshotsavगणेशोत्सव