सण, उत्सव साधेपणाने साजरे करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 05:18 PM2020-08-16T17:18:29+5:302020-08-16T17:18:37+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत.

Celebrate the festival with simplicity, appeal of Deputy Chief Minister Ajit Pawar | सण, उत्सव साधेपणाने साजरे करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

सण, उत्सव साधेपणाने साजरे करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Next

बारामती - बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा कोणताही विलंब न होता तत्काळ मिळाल्या पाहिजेत. कोरोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये जे काही सण, उत्सव येतील ते साधेपणाने व गर्दी न करता साजरे करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी केले.
कोरोना बाबतची आढावा बैठक  बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा मिळण्यास रूग्णांना त्रास होऊ नये, अशा सूचना  त्यांनी दिल्या.  कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून  गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग, पुणे) संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, अधिष्ठाता डॉ. तांबे, डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, संभाजी होळकर, किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव  आदी  उपस्थित होते.

Web Title: Celebrate the festival with simplicity, appeal of Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.