एचआयव्ही बाधितांबरोबर दिवाळी साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 00:22 IST2018-11-12T00:22:15+5:302018-11-12T00:22:40+5:30
महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावलीचा सण साजरा करण्यात आला.

एचआयव्ही बाधितांबरोबर दिवाळी साजरी
चाकण : महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावलीचा सण साजरा करण्यात आला. दिवाळी सण हा जीवनातील अंध:कार दूर करून सकारात्मक जीवन जगायला सांगतो, असाच प्रामाणिक हेतू ठेवून महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि.ने एचआयव्हीसह जीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावली कार्यक्रमाचे आयोजन आपल्याच अंगणात करून दिवाळीचा आनंद साजरा केला. याद्वारे समाजातील एचआयव्ही बाधितांविषयीचा असणारा भेदभाव, कलंक गैरसमज दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा व्हेइकल मॅन्युफॅक्चरर्स लि. प्लांटचे प्रमुख नचिकेत कोडकनी, जोन डीसा, डॉ. अमोल भांबरे, मार्शल थॉमस, प्रवीण गुंजाळ, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या व मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. नचिकेत कोडकनी यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कंपनीचा सकारात्मक दृष्टिकोन सांगितला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना व पालकांना दिवाळीच्या भेटवस्तूसह मिठाई, फराळाचे वाटप करण्यात आले.
मनोरंजनाच्या कार्यक्रमात महिंद्रा कंपनीचे व यश फाउंडेशन स्वयंसेवक यांनी मुलांसोबत नृत्य करून दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमात एचआयव्ही सहजीवन जगणारी २५० मुले व पालकांनी सहभाग नोंदविला. सीएसआरचे उपव्यवस्थापक प्रवीण गुंजाळ, सनी लोपेझ, आदी कंपनी व यश फाउंडेशन स्वयंसेवक, इतर अधिकारी उपस्थित होते.