शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

Omicron Variant: ख्रिसमस पन्नास टक्के उपस्थितीतच साजरा करा; जिल्हा प्रशासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 8:09 PM

गेल्या काही दिवसांत राज्यसह पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ख्रिसमस साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत

पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यसह पुण्यात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ख्रिसमस साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत. यात सर्व चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या पन्नास टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी देखीर रस्त्यावर गर्दी करू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमायक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता असल्याने या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठया प्रमाणात एकत्र न येता नाताळचा सण साजरा करणे अपेक्षित असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले. या संदर्भातील जिल्हा प्रशासनाने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. यामध्ये ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा. 

''भारतीय नागरीक नात्याने सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत. कोरोना वातावरणात एकमेकांचा विचार करून सर्वांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. यंदाचा ख्रिसमस सण सर्व धर्मियांबरोबर साजरा करा. गरिबांना मदत करा असे आवाहन पुणे धर्मप्रांताचे बिशप रेव्ह. डॉ बिशब थॉमस डाबरे यांनी केले आहे.''   

या नियमांचे पालन करा 

- चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही.  - मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.-  सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. - कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये.  - फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. - महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. 

टॅग्स :PuneपुणेOmicron Variantओमायक्रॉनChristmasनाताळSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या