शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

सीबीएसई ‘नीट’परीक्षा केंद्रातील प्रवेश यंदाही ‘कडक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:00 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत ‘नीट’ ही परीक्षा दि. ६ मे रोजी घेतली जाणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेश पत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे. या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे‘सीबीएसई’ मागील वर्षीपासून परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठी ड्रेस कोडसह विविध नियम नियमावलीचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’च्या परीक्षा केंद्रात जाण्यासाठी यंदाही कडक नियमावली करण्यात आली आहे. ड्रेस कोडसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तु, दागिने तसेच इतर साहित्य केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व परीक्षा केंद्र ‘नो टॉलरन्स झोन’ असतील, असे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया प्रवेश पत्रावर स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत ‘नीट’ ही परीक्षा दि. ६ मे रोजी घेतली जाणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेश पत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे. या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. ‘सीबीएसई’ मागील वर्षीपासून परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठी ड्रेस कोडसह विविध नियम बनविले होते. त्यावेळी त्यावर टीकाही झाली. पण यंदाही ही नियमावली कायम ठेवण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ड्रेस कोड आणि इतर बंदी घातलेल्या वस्तुंसाठी सर्व परीक्षा केंद्र ‘नो टॉलरन्स झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सुचनेनुसार आवश्यक साहित्य असल्यासच प्रवेश केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र याशिवाय कोणत्याही वस्तु परीक्षा केंद्रात आणता येणार नाहीत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच पेन दिला जाईल. तसेच प्रवेशासाठीची गर्दी टाळण्यासाठी ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० अशा दोन वेळा देण्यात आल्या असून या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे.-------------------परीक्षेसाठीचा ड्रेसकोड- फिकट रंगाचे अर्ध्या बाह्याचे कपडे घालून यावे- कपड्यांवर मोठ्या आकाराची बटन्स, बॅज किंवा दागिने असू नयेत.- मुलींनी कपड्यांवर फुलांचे आकार, नक्षीकाम असलेले कपडे घालु नयेत.- चालीरितीनुसार कपडे घालणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास आधी यावेळी लागेल. - स्लीपर, कमी उंचीचे सँडल्स घालावेत, बुट घालता येणार नाहीत...............परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तु- कोणत्याही प्रकारचा कागद, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच- सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य- बेल्ट, हॅन्डबॅग, पाकीट, गॉगल्स- अंगठी, माळ यांसह सर्व प्रकारचे दागिने- घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा- पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ- कोणत्याही प्रकारच्या धातुच्या वस्तु

  

टॅग्स :PuneपुणेCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक