‘नीट’च्या परीक्षा केंद्रात बदल नाही : सीबीएसई मंडळाचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 07:27 PM2018-04-19T19:27:22+5:302018-04-19T19:32:18+5:30

 ‘सीबीएसई’ मंडळामार्फत नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे.

no change in 'NEET' examination center, clarification of CBSE board | ‘नीट’च्या परीक्षा केंद्रात बदल नाही : सीबीएसई मंडळाचे स्पष्टीकरण 

‘नीट’च्या परीक्षा केंद्रात बदल नाही : सीबीएसई मंडळाचे स्पष्टीकरण 

Next
ठळक मुद्देपरीक्षेसाठी नियमानुसारच केंद्र, संगणकाद्वारेच दिली जातात केंद्र

पुणे : विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी देण्यात आलेल्या परीक्षा केंद्र किंवा शहरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (सीबीएसई) केले आहे. प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याबाबत विनंती केली होती.
 ‘सीबीएसई’ मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेची प्रवेश पत्र दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. त्यावर सीबीएसईने अशाप्रकारे केंद्र बदलले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र अन्य शहरामध्ये मिळावे, पहिल्या पसंतीच्या शहरातील केंद्र न मिळाल्याने बदल करावा, चुकीने निवडलेले केंद्र मिळाल्याने बदल करणे, तीन पसंतीपैकी एकही शहरात केंद्र न मिळल्याने बदल करणे अशी विनंती सीबीएसईकडे करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी नियमानुसारच केंद्र दिली जातात. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. संगणकाद्वारेच केंद्र दिली जातात. विद्यार्थ्यांना केंद्र दिल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याआधारे केंद्र दिली जात नाहीत, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
----------------

Web Title: no change in 'NEET' examination center, clarification of CBSE board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.