CBSE Class 12th result: द ऑर्बिस स्कूलची इयत्ता १२ वीच्या निकालात १००% यशाची नोंद

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 22, 2022 02:12 PM2022-07-22T14:12:42+5:302022-07-22T14:18:56+5:30

द ऑर्बिस स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उत्तम यश...

CBSE Class 12 Result 2022 The Orbis School 100 percent Pass in Class 12th Result | CBSE Class 12th result: द ऑर्बिस स्कूलची इयत्ता १२ वीच्या निकालात १००% यशाची नोंद

CBSE Class 12th result: द ऑर्बिस स्कूलची इयत्ता १२ वीच्या निकालात १००% यशाची नोंद

googlenewsNext

पुणे : आजच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता १२वीच्या निकालात द ऑर्बिस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश व उत्कृष्ट कामगिरी केली आहे. द ऑर्बिस स्कूल मध्ये तीनही विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुणांची टक्केवारी खालील प्रमाणे-

द ऑर्बिस स्कूलमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी :

सायन्स विभाग - आरव कनोडिया :९७.४%

कॉमर्स विभाग - वैष्णवी सक्सेना : ९९%

ह्यूमनीटीएस विभाग - अदिती राजन :९५.८%

याप्रसंगी बोलताना द ऑर्बिस स्कूलच्या संचालक मुख्याध्यापिका श्रीमती गुंजन श्रीवास्तव म्हणाल्या की "कोविड महामारीच्या व्यत्ययानंतरही, केशवनगर येथील आमच्या द ऑर्बिस स्कूलचा १००% हा उल्लेखनीय निकाल लागला आहे. हे सर्वांच्या मेहनतीचे एकत्रित यश आहे.  गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांसमोर अनेक अडथळे येऊन देखील, हे मिळवलेले उत्तम यश पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. मी विशेषतः अशा मार्गदर्शकांचे कौतुक करू इच्छिते, ज्यांनी विद्यार्थ्यांवरील विश्वास कायम ठेवून त्यांना उत्तम मार्गदर्शन केले."

द ऑर्बिस स्कूल मध्ये प्रथम आलेला विद्यार्थी ९९% गुणांनी उत्तीर्ण झाला असून संपूर्ण वर्गाणी चांगले प्रदर्शन केले आहे. यातच द ऑर्बिस स्कूलचे यश दिसून येत आहे की स्कूल प्रत्येक विद्यार्थ्या पर्यंत पोहचून त्यांना मार्गदर्शन व पाठिंबा देण्यात यशश्वी झाले आहे.

पूर्ण समर्पण, स्ट्रक्चर्ड अभ्यास आणि अभ्यासाच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करून द ऑर्बिस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हे यश सुनिश्चित केले असून त्यांच्या पालकांना आणि शाळेला अभिमान आहे. द ऑर्बिस स्कूल विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते, ज्यांनी या यशात योगदान दिले आहे.

Web Title: CBSE Class 12 Result 2022 The Orbis School 100 percent Pass in Class 12th Result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.