सीबीएसई बारावीचा शनिवारी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 08:52 PM2018-05-25T20:52:20+5:302018-05-25T20:52:20+5:30

सीबीएसई मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे.

CBSE board exam results on Saturday | सीबीएसई बारावीचा शनिवारी निकाल

सीबीएसई बारावीचा शनिवारी निकाल

Next
ठळक मुद्देदेशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
बारावीची परीक्षा दि. ५ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. देशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची ४ हजार १३८ केंद्रांवर परीक्षा झाली. मंडळाच्या www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध असेल. निकालानंतर मंडळाकडून दि. ९ जूनपर्यंत सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत दुरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थी व पालकांना इयत्ता दहावी व बारावी निकालबाबतच्या अडचणींबाबत देशभरातील ६९ तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन मिळेल. त्यामध्ये शाळांच्या प्राचार्य, प्रशिक्षित समुपदेशक, शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. समुपदेशनासाठी  १८००११८००४ हा टोल फ्री क्रमांक आहे. 

Web Title: CBSE board exam results on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.