शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सात बारावरील दुरुस्तीच्या प्रतीसाठी तलाठ्याला लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:32 IST

जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़ ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़.

ठळक मुद्देलोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़. ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़.  गेणभाऊ जयवंत शेवाळे (वय ५२, रा़. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे या तलाठ्याचे नाव आहे़. तक्रारदार यांनी कदमवाकवस्ती येथे २० गुंठे जमीन खरेदी केली होती़. या खरेदीची सात बाराच्या उताऱ्यावर चुकीची नोंद करण्यात आली होती़. त्यांनी नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता़. त्यावरुन दुरुस्त करण्यात आलेल्या सात बाराची प्रतीवर सही शिक्का देऊन सात बाराची प्रत देण्यासाठी तलाठी शेवाळे यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली होती़.त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़. त्याची पडताळणी केल्यानंतर बुधवारी गेणभाऊ शेवाळे यांच्या कदमवाकवस्ती येथील घरी सापळा रचण्यात आला़. त्यांनी तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले़. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस