शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 13:32 IST

मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ, कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडाकरी यांनी जातीपातीच्या राजकारणकवरून एक मिश्किल टिपण्णी केली आहे. निवडणुकीच्या काळात जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यावर आपल्या बायकोला, मुलीला आपल्या चमच्याला, आपल्या ड्राइवरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं असं म्हणत त्यांनी राजकारणी लोकांना एका प्रकारे सल्ला दिला आहे. या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही हा बर? असं ते मिश्कीलपणे टोला लगावला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचे भूमिपूजन या कार्यक्रमात ते बोलत होते. 

गडकरी म्हणाले,  मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधी राजकरण केले नाही. मी फक्त समाजकार्य करत असतो. मी लोकसभेत उभा होतो. सगळ्या जातीपंथाची लोक त्यावेळी आली होती. तेव्हा मी सांगितलं कि माणूस जातीने नव्हे तर त्याच्या गुणांनी मोठा होत असतो. आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आहे. समाजातील जातीयता उच्च निच्चतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे. आणि सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे. निवडणुकीच्या काळात जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यावर आपल्या बायकोला, मुलीला आपल्या चमच्याला, आपल्या ड्राइव्हरला तिकीट द्यायचं हे काम नाही करायचं. या स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल मी हे बोलत नाही हा बर? आणि म्हणून जातीयता उच्च निच्चतेच भाव आपल्याला नष्ट करायचा आहे. हाच मानवतेचा धर्म तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलं आहे. 

पसायदान डिजिटल करणार 

महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे, गजानन महाराज, गाडगे महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या अभांगानी आपल्या सगळ्यांच जीवन संपन्न केलय.  मी शाळेत शिकताना शिक्षकांनी पसायदान शिकवलं. पसायदानाचा अर्थ एवढा मोठा आहे कि महाराष्ट्राच्या सारस्वताच खूप मोठे वैभव आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून सेवेचा मार्ग दाखवला आहे.  माझी इच्छा आहे तुकाराम महाराज गाथा ज्ञानेश्वरी असं मी डिजिटल तयार करणार आहे. त्या डिजिटल मध्ये पेन जो असतो त्या पसायदानावर ठेवला कि ते सुरु होईल. तसेच तिन्ही इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेत ऐकायला मिळेल. दिल्लीत एका कंपनीच्या मालकाशी बोललो आहे. त्याच कामही सुरु झालं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस