इलेक्ट्रिक साहित्य दुकानातील रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:40+5:302020-12-08T04:11:40+5:30
पुणे : इलेक्ट्रिक साहित्य विक्री करणार्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना कर्वेनगरमध्ये ...

इलेक्ट्रिक साहित्य दुकानातील रोकड लंपास
पुणे : इलेक्ट्रिक साहित्य विक्री करणार्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना कर्वेनगरमध्ये घडली.
याबाबत अनिल चुरी (वय ४०, रा. धायरी, सिंहगड रस्ता) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चुरी यांचे कर्वेनगरमधील संजय गांधी वसाहतीत इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. चुरी एका सोसायटीत दुरुस्तीच्या कामासाठी १ डिसेंबर रोजी गेले होते. त्यांचा मुलगा दुकानात थांबला होता. इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी करण्यासाठी चुरी यांनी बँकेतून काही रोकड काढून गल्ल्यात ठेवली होती. दुपारी तीनच्या सुमारास दोन चोरटे दुकानात खरेदीच्या बहाण्याने आले.
चुरी यांच्या मुलाला २ हजार रुपये देऊन त्यांनी इलेक्ट्रिक साहित्य घेतले. त्यानंतर चोरट्यांनी वायर बंडल देण्याची मागणी केली. चुरी यांचा मुलगा दुकानाच्या पलीकडे वायर आणण्यासाठी गेले असताना एका चोरट्यांनी गल्ल्यातील ३० हजारांची रोकड काढून घेतली आणि दुचाकीवरुन पसार झाले.