मराठा कार्यकर्त्यांवरील केसेस पुणे बार असाेसिएशन माेफत लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 18:19 IST2018-07-26T18:18:08+5:302018-07-26T18:19:32+5:30
मराठा समाजाच्या अारक्षणाला पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात अाला अाहे. तसेच या अांदाेलनदरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस माेफत लढवल्या जाणार असल्याचेही बार असाेसिएशनकडून जाहीर करण्यात अाले अाहे.

मराठा कार्यकर्त्यांवरील केसेस पुणे बार असाेसिएशन माेफत लढणार
पुणेः वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या राजव्यापी आंदोलनास पाठींबा दिला आहे. आंदोलन काळात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस बार असोसिएशनकडून मोफत लढविल्या जाणार असल्याची माहिती अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांनी दिली.
सध्या सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशननेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आंदोलनास पाठींबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत. ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखला आहेत. त्या आंदोलनकर्त्यांनी याबाबतची माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनला द्यावी, असे आवाहन ऍड. पवार यांनी यावेळी केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती असोसिएशनकडून करण्यात आली आहे.