शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

फी न भरल्याने मुले वर्गाबाहेर, आरएमडी सिंहगड शाळेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:37 AM

वारजे येथील आरएमडी सिंहगड शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांच्या मागे शैक्षणिक फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. यापैकी मंगळवारी शाळेने प्रत्येक इयत्तेचे सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत खालच्या मजल्यावर एका वर्गात सुमारे दोन तास ठेवले.

वारजे - येथील आरएमडी सिंहगड शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांच्या मागे शैक्षणिक फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. यापैकी मंगळवारी शाळेने प्रत्येक इयत्तेचे सुमारे १०० ते १२५ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत खालच्या मजल्यावर एका वर्गात सुमारे दोन तास ठेवले. यातील काही विद्यार्थ्यांना बाथरूमला जाण्यासही मनाई करण्यात आली होती.वास्तविक शाळेचे शैक्षणिक वर्ष आताच सुरू झाले आहे. शाळेने सर्व विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत वर्षभराची फी एकरकमी (सुमारे ३६,००० ते ४०,००० रुपये) आगाऊ भरण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच शाळेने बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार फीसाठी मुलांना जबाबदार धरता येत नाही, शिवाय फीबाबत पालकांशी संपर्क साधने गरजेचे असताना नाहक लहान वयाच्या विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. शिवाय संस्थेच्या इतर कॅम्पस वडगाव व कोंढवा येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनाही तत्काळ फी भरा, नाहीतर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका, असे मोबाइलवर फोन करून सांगण्यात आले आहे, असा आरोप जागरूक पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे यांनी केला आहेफी वाढीसंदर्भात गेल्या वर्षीही शाळा प्रबंधन व पालक संघटना यांच्यातील वाद शिक्षण उपसंचालक कार्यालयपर्यंत गेला होता. त्यावेळी तेथे सुनावणी होऊन शाळेने पालकांना फीचे टप्पे करण्यासादर्भात निर्देश दिले गेले होते. पण शाळेच्या वतीने या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यातच बसप्रवास शुल्क देखील नियमबाह्य पद्धतीने १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले गेले आहे. मंगळवारच्या प्रकाराबद्दल दाद मागण्यासाठी पालक संघ सदस्यांनी एकत्र येथे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांना तक्रार देऊन दाद मागितली आहे. राऊत यांनीही फीची सक्ती न करता टप्पे करण्यासंदर्भात शाळेला निर्देश देण्याचे संकेत दिले आहेत.माझा मुलगा दुसरीत शिकत असून बुधवारी लाँग ब्रेकनंतर वर्गातील फी न भरलेल्या निवडक चार-पाच मुलांना बाहेर काढून खालच्या मजल्यावर जमिनीवर बसवण्यात आले. मुलाला लघवीलाही जाऊ दिले नाही. त्यामुळे मूल भेदरलेले होते. गुरुवारी त्याने शाळेला जाण्यासही नकार दिला होता. याबबात शिक्षण अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.- सुमन गोसावी, पालकशाळेने फी साठी मुलांना त्रास देणे तत्काळ थांबवावे. अन्यथा संस्थेमार्फत विरोधात असहकार आंदोलन पालक संघटनेमार्फत करण्यात येईल. - निंबा बोरसे, पालकशाळेच्या या मनमानी कारभाराबद्दल प्रतिष्ठांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. आमच्या तेजोवलाय सोसायटीतील बरीच मुले वारजे कॅम्पस शिक्षण घेत आहेत. त्यांनाही शाळेच्या या जाचाचा फटका बसला आहे. शाळा एका बाजूला विद्यार्थ्यांकडे फीची मागणी करत आहे, दुसºया बाजूला शिक्षकेतर कर्मचा-यांचे व शिक्षकांचे मागील अनेक महिण्याचे पगार थकवले आहेत. गेल्या वर्षी नियमित फी भरणाºयांचे पैसे कुठे गेले? हा यक्षप्रश्न आहे.- निवृत्ती येनपुरे, अध्यक्ष,वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठानमी बुधवारी दिवसभर परदेशातून परतीच्या प्रवासात होते. त्यामुळे कॅम्पसमध्ये काय घडले याची माहिती नाही. आज माहिती घेऊ. पण काही विद्यार्थ्यांनी गेल्या वषीर्चीही फी भरली नाही. त्यांच्याबाबत नरमाईचे धोरण ठेवून कसे चालेल ? मुलांना वर्गाबाहेर काढलेले नाही फक्त त्यांना फी भरण्याची सूचना करण्यात आली आहे.- स्मिता सावंत, मुख्याध्यापक सिंहगड, वारजे कॅम्पस

टॅग्स :Studentविद्यार्थीnewsबातम्या