शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात २५ लाखांच्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 18:54 IST

सापळा रचून दोघांना पकडले

ठळक मुद्दे मांडूळ जातीचा साप शिरुर वनविभागाच्या ताब्यात

शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील पोलिसांच्या पथकाने कोरेगाव भीमा जवळ असणाऱ्या वडगाव परिसरात तस्करी करणाऱ्या दोघांकडून तब्बल पंचवीस लाखांचा  दुर्मिळ असा मांडूळ जातीचा साप जप्त केला आहे. याप्रकरणी प्रमोद अजितराव साळुंके (वय २४, रा. कोरेगाव भीमा) व सागर गजानन जाधव (वय २२ रा. शिरूर) या दोन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई बापू भास्कर हाडगळे (रा. शिक्रापूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडगाव येथे दोन युवकांनी मांडूळ जातीचा साप पकडून ठेवला असून त्याची तस्करी करणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या पथकाने वडगाव परिसरात सापळा रचला. त्यांना दोघे संशयित युवक दुचाकीहून जाताना दिसले. त्यांच्या जवळ निळ्या रंगाचा बॉक्स होता. या दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.

पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडून त्यांच्या जवळ पाहणी केली. निळ्या बॉक्समध्ये माती असल्याचे आढळून आले. मातीखाली तपासणी केल्यावर त्यामध्ये मांडूळ जातीचा साप असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या जवळील तब्बल पंचवीस लाख रुपये किमतीचा दुर्मिळ मांडूळ जातीचा साप दुचाकी तसेच दोन मोबाईल असा तब्बल पंचवीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेला मांडूळ जातीचा साप शिरुर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसShirurशिरुरArrestअटक