एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:56+5:302021-02-05T05:18:56+5:30
पुणे : बांधकामास विरोध करणाऱ्या एकाच्या डोक्यात खुर्ची घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवकावर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ...

एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल
पुणे : बांधकामास विरोध करणाऱ्या एकाच्या डोक्यात खुर्ची घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवकावर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय खडकी येथे गुरुवारी (दि.२८) दुपारी १ वाजता हा प्रकार घडला.
दुर्योधन तुकाराम भापकर (वय ४४, रा. नितीनराज हौ. सोसा., ईस्ट खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन मनोहर शिंदे (वय ३९, रा.२०६ गवळीवाडा, दर्गा वसाहत, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयात डॉ. मुलाणी, त्यांच्या पत्नी आणि नगरसेवक यांच्यासमवेत बैठकीमध्ये उपस्थित होते. डॉ. मुलाणी हे फिर्यादी यांच्या घराशेजारी राहतात. उपाध्यक्षांनी फिर्यादीला ‘डॉ. मुलाणी यांच्या क्लिनिकच्या डागडुजी करत असलेल्या बांधकामाला तुमचा विरोध आहे’, असे नगरसेवकाचे म्हणणे आहे. मात्र डॉ. मुलाणी यांच्या बांधकामाला माझा कोणताही विरोध नाही, असे फिर्यादी यांनी सांगितले. त्यावेळी आरोपी नगरसेवकाने फिर्यादीला शिवीगाळ करून बैठकीतील खुर्ची त्यांच्या डोक्यात मारून ‘तुला जीवे मारतो’ अशी धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.