तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:47 AM2018-01-17T05:47:28+5:302018-01-17T05:47:37+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

In the case of the girl's suicide, the accused filed a complaint | तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. किशोर हनुमंत रणदिवे (रा़ राजापूर, ता़ श्रीगोंदा, जि़ अहमदनगर) असे त्याचे नाव आहे़ विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सोमवारी दुपारी रेश्मा रवींद्र गायकवाड (वय २२) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती़
आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती़ यावरून चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी तिचे वडील रवींद्र महादेव गायकवाड (वय ४८, रा़ नारायणगव्हाण, ता़ पारनेर, जि़ अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे़ किशोर रणदिवे हा गेल्या तीन वर्षांपासून रेश्मा हिला ‘तुझ्या वडिलांना मारीन’ अशी वारंवार धमकी देत होता़ त्यातून होणा-या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे रेश्मा हिने चिठ्ठीत म्हटले होते़.  यावरून पोलिसांनी किशोर रणदिवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. 

Web Title: In the case of the girl's suicide, the accused filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा